government schemes  
कृषी सल्ला

रब्बी हंगामातील पीक स्पर्धा

पीक स्पर्धेमध्ये सहभागी शेतकऱ्याच्या शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.

विनयकुमार आवटे

पीक स्पर्धेमध्ये सहभागी शेतकऱ्याच्या  शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि उत्पादन वाढविणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलामध्ये वाढ होऊन ते नवीन उमेदीने नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. त्यांच्यापासून इतर शेतकरी प्रेरणा / मार्गदर्शन घेऊन आपले उत्पादन वाढवतील. या उद्देशाने राज्यात विविध तृणधान्य, कडधान्य, तेलबिया पिकांसाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. रब्बी हंगामातील पिकांसाठी पुढीलप्रमाणे पीक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.  कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठामध्ये झालेले संशोधन, यातील तंत्रज्ञानाचा स्विकार, पिकांच्या सुधारित जातींची लागवड, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव यांचा वापर करून बरेच शेतकरी पीक उत्पादनवाढीमध्ये सातत्य ठेवत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ही चांगली संधी आहे. पीक स्पर्धेतील समाविष्ट पिके  ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ  पीक स्पर्धा बक्षीस स्वरूप सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

स्पर्धा पातळी  पहिले     दुसरे  तिसरे
 तालुका पातळी ५,०००     ३,०००     २,००० 
 जिल्हा पातळी  १०,०००     ७,०००     ५,००० 
विभाग पातळी २५,०००     २०,०००     १५,००० 
राज्य पातळी   ५०,०००     ४०,०००     ३०,०००

  ठळक वैशिष्ट्ये व बाबी 

  • पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा  घटक आधारभूत धरण्यात येतो.
  • पीक स्पर्धेमध्ये  सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल.
  • स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असावी. जमीन तो स्वत: कसत असला पाहिजे.
  • स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एका वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
  • पीक स्पर्धा तालुक्यात सर्वसाधारण  व आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येते.  
  • पीक स्पर्धेतील समाविष्ट पिकांपैकी ज्या पिकाखाली तालुक्यात किमान क्षेत्र १००० हेक्टर आहे, त्या पिकाकरितास्पर्धा आयोजित करण्यात येते. हे संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील आणि  त्याच पिकांसाठी स्पर्धकांना भाग घेता येईल.
  • तालुक्यात स्पर्धा घेण्यासाठी  ते पीक घेणाऱ्या स्पर्धकांची किमान आवश्यक संख्या ः सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटासाठी ५ आहे. यापेक्षा कमी प्रवेश अर्ज आल्यास पीक स्पर्धा रद्द करण्यात येते. 
  • पीक स्पर्धेमध्ये सहभागी शेतकऱ्याच्या  शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
  • पीक स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकाने स्पर्धेतून माघार घ्यावयाची झाल्यास, कापणीपूर्वी १५ दिवस अगोदर माघार घेतल्याचे सर्व संबंधित अधिकाऱ्यास लेखी कळवावे.
  • स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी  प्रवेश शुल्क ः ३०० रुपये प्रति अर्ज.
  • स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : ३१ डिसेंबर २०२१ 
  • अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास, त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी.
  • पीक स्पर्धेत भाग घेऊ शेतकऱ्यांनी विहित नमुन्यांतील अर्ज भरून, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन व ७/१२ , ८-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागद पत्रांची पूर्तता करून संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्याकडे द्यावेत. 
  • तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी राज्य, विभाग किंवा जिल्हा पातळीवरील स्पर्धेत विजेता ठरल्यास त्याला केवळ उच्च पातळीवरील स्पर्धा विजेते घोषित करण्यात येऊन त्या पातळीवरील बक्षीस रक्कम मिळेल.
  •  संपर्क या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ -http://www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. 

    - विनयकुमार आवटे (उप आयुक्त, कृषी गणना, पुणे-५)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Village Story: आठवणींची फुलवात...

    El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

    Water Conservation: जल-सृष्टी व्यवस्थेचे जनकेंद्री पुनरुज्जीवन

    Grain Storage Pest Management: धान्य साठवणुकीतील ‘लेसर ग्रेन बोरर’

    Rural Education Programme: जैवविविधता, शिक्षणाशी जोडणारी मायेसा फाउंडेशन

    SCROLL FOR NEXT