Rose Flowers should be harvested at proper stage 
कृषी सल्ला

गुलाब फुलांचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञान

फूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे. दांड्यांच्या काप बाहेरच्या बाजूला दिशा असलेल्या वरच्या बाजूला घ्यावा. सर्वसाधारणपणे बहुतेक ठिकाणी फुले काढताना कापाच्या खाली पाच पानांचे एक या प्रमाणे दोन पर्णगुच्छ राहतील हे पाहावे.

दशरथ पुजारी

फूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे. दांड्यांच्या काप बाहेरच्या बाजूला दिशा असलेल्या वरच्या बाजूला घ्यावा. सर्वसाधारणपणे बहुतेक ठिकाणी फुले काढताना कापाच्या खाली पाच पानांचे एक या प्रमाणे दोन पर्णगुच्छ राहतील हे पाहावे. काढल्यानंतर फुलदांड्यांची खालील टोके स्वच्छ पाण्यात राहतील, अशा प्रकारे बादलीमध्ये ठेवावीत. लागवडीनंतर आलेल्या तळ फुटव्यांची काढणी साधारणतः चार महिन्यानंतर चालू होते. तळ फुटव्यांची काढणी खालून तिसरे ते चौथे पान सोडून केली जाते. त्या खालील डोळे फुटून पाच ते सात आठवड्यांमध्ये काढणीयोग्य फुले येतात. या फुलांची काढणी मात्र दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर करावी. तळफुटव्यांतून आलेल्या फुलांच्या काढणीनंतर येणाऱ्या सर्व फुलांची काढणी पुढे नियमितपणे दुसऱ्या पानांजवळ केली जाते.

  • बाजारपेठेच्या मागणी व अंतरानुसार फुलांची काढणी कळी व त्यानंतरच्या अवस्थांमध्ये केली जाते. सामान्यतः कळ्यांचा रंग पूर्ण दिसलेल्या अवस्थेत, मात्र पाकळ्या उमलण्याआधी काढणी केली जाते. काप घेतल्यापासून त्या काडीवर उन्हाळ्यात ३८ ते ४२ दिवसांनी आणि हिवाळ्यात ५५ ते ६० दिवसांनी पुढील फुलाचे उत्पादन मिळते.
  • फूल काढणीसाठी स्वच्छ आणि धारदार सिकेटर वापरावे. दांड्यांच्या काप बाहेरच्या बाजूला दिशा असलेल्या वरच्या बाजूला घ्यावा. सर्वसाधारणपणे बहुतेक ठिकाणी फुले काढताना कापाच्या खाली पाच पानांचे एक या प्रमाणे दोन पर्णगुच्छ राहतील हे पाहावे. काढल्यानंतर फुलदांड्यांची खालील टोके स्वच्छ पाण्यात राहतील, अशा प्रकारे बादलीमध्ये ठेवावीत.
  • फुले काढल्यानंतर पंधरा मिनिटांत प्रतवारी केंद्रावर (ग्रेडिंग हॉल) न्यावीत. पाण्यात ॲल्युमिनिअम सल्फेट प्रिझर्व्हेटिव्ह मिसळून, तयार द्रावणात ३ तास फुले ठेवावीत. पॅकिंग हॉलचे तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास ठेवावे. नंतर प्रतवारी करावी. प्रतवारीनंतर फुले पुन्हा याच द्रावणात किंवा क्लोरीनच्या पाण्यात ठेवावीत. बादलीत ७-१० सेंमीपर्यंत द्रावण असावे. या द्रावणात फुले पॅकिंग करेपर्यंत ठेवावीत. जर वरील प्रिझर्व्हेटिव्ह उपलब्ध नसतील तर ३ किलो साखर अधिक ६ ग्रॅम सायट्रिक अॅसिड प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार केले. हे द्रावण बादलीमध्ये ७-१० सेंमीपर्यंत भरावे. त्यात फुले ठेवावीत.
  • प्रतवारी 

  • गुलाबाच्या फुलांची प्रतवारी फुलदांड्याच्या लांबीनुसार केली जाते. प्रत्येक ग्रेडमध्ये १० सें.मी. अंतर ठेवावे. फुलांची ग्रेड ३० ते ९० सें. मी. ग्रेडमध्ये केली जाते.
  • फुलदांड्याच्या लांबीबरोबरच दांड्याची जाडी, फुलांचा आकार, पाने व रोग व कीटकनाशकांच्या रेसिड्यू यांचाही विचार प्रतवारी करताना केला जातो. प्रतवारी केलेल्या एका ग्रेडमधील सर्व फुले एकाच दर्जाची असावीत. बंचमधील एखाद्या खराब फुलामुळे साऱ्याच फुलांची प्रत कमी धरली जाते. ग्रेडिंगनंतर पुन्हा फुले प्रिझर्व्हेटिव्ह द्रावणात ठेवावीत.
  • फुलांची प्रतवारी करताना महत्त्वाच्या बाबी  फुलांची निर्यात करण्यासाठी फुलांची प्रतवारी काटेकोरपणे करावी लागते.

  • गुच्छ बांधताना प्रत्येक फुलकळीचे आकार सारखा असावा.
  • फुल कळ्यांची उंची सारखी असावी.
  • फुलदांड्यांची जाडी व कठीणपणा सारखा असावा.
  • प्रतवारी करताना एकाच लांबीचे फुलदांडे बांधावेत.
  • पॅकिंग खोक्यावर फुलांची जात, फुलांची संख्या, फुलदांडे ची लांबी आणि पॅकिंग केलेले तारीख नमूद करावी.
  • पॅकिंग 

  • शक्यतो मागणीनुसार फुलांची गड्ड्या बांधाव्यात. सामान्यतः गुलाबामध्ये २० फुलांची एक जुडी बांधली जाते. फुलांच्या बाजूने रॅपिंग पेपर गुंडाळून रबर लावले जाते. असे पेपरमध्ये गुंडाळलेले बंच कोरूगेटेड बॉक्समध्ये भरावेत. १०० × ४० × २० सें.मी.च्या आकाराच्या बॉक्सला आतून पॉलिथिनचे लायनिंग व हवा खेळती राहण्यासाठी छिद्रे असावीत. बॉक्स भरल्यानंतर त्यातील हवा बाहेर खेचून काढली जाते. त्याजागी थंड खेचली जाते. (प्रीकूलिंग). शीतगृहातील तापमान २ अंश सेल्सिअसपर्यंत असावे. बॉक्सचे तापमान शीतगृहाच्या तापमान इतके होण्यास १०-१२ तास लागतात. शीतगृहात ९० टक्क्यांच्या आसपास आर्द्रता ठेवावी. फुलातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही.
  • निर्यातीसाठी फुले पाठवता दोन अंश सेल्सिअस तापमानाची शीतसाखळी असावी. काढणीपासून पॅकिंग व नंतर विमानतळापर्यंत शीत वाहनामार्फत पोहोचवावीत.
  • शीतसाखळी  फुलांचा टिकाऊपणा हा फुलांची झाडावरून काढणी केल्यापासून ग्राहकांच्या हातात पोहोचेपर्यंत ती ताजी व टवटवीत राहिली पाहिजेत. फुले अत्यंत नाजूक आणि नाशवंत असून, संपूर्ण हाताळणी अलगद, सावध आणि हळुवारपणे करावी लागते. तसेच त्याचे तापमान कमी व आर्द्रता ही स्थिर असावी लागते. त्यासाठी शीतसाखळी पुढील प्रमाणे असावी.

  • शेतावर शीतगृह.
  • वाहतुकीसाठी रेफर व्हॅन.
  • विमानतळावरही शीतगृह.
  • विमानात त्वरित माल भरणे.
  • विमानात शीतगृह सुविधा.
  • माल उतरल्यावर तो शीतगृहात ठेवणे.
  • पुन्हा रेफर व्हॅनमधून ग्राहकाकडे पोहोचवणे.
  • उत्पादनाचे नियोजन  सर्वसाधारणपणे जातीपरत्वे प्रत्येक झाडास पंचवीस ते तीसपर्यंत चांगल्या प्रतीचे फुलदांडे मिळतात. एक एकर हरितगृहातून प्रति दिवस २००० इतके निर्यातक्षम फुलदांडे मिळू शकतात. - दशरथ पुजारी, ९८२३१७७८४४, ९८८१०९७८४४ (लेखक तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे येथील खासगी फूल उत्पादक कंपनीत कार्यरत आहेत.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

    Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

    Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

    Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

    Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

    SCROLL FOR NEXT