खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परिक्षणाचा आधार घ्यावा. 
कृषी सल्ला

खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची खतमात्रा ठरवावी. त्यामुळे गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते.

डॉ. पपिता गौरखेडे

माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची खतमात्रा ठरवावी. त्यामुळे गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते. पिकांना रासायनिक खतांद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र (युरिया), स्फुरद (सुपर फॉस्फेट), पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश), सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते (झिंक सल्फेट, आयर्न सल्फेट, बोरॅक्स) इत्यादींचा पुरवठा केला जातो. पिकांना दिलेली खतमात्रा पिकांकडून पूर्णतः शोषली जात नाही. पिके त्यातील काही अंश शोषून घेतात. उर्वरित अन्नद्रव्यांचा (पाणी, हवा, तापमान यामुळे) ऱ्हास होतो. वापरलेल्या एकूण खताच्या प्रमाणापैकी जो काही अंश पिके शोषण करतात आणि त्यामुळे जी उत्पादनात वाढ होते, त्यास ‘खत वापराची कार्यक्षमता’ म्हणतात. अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्यक्षमता  अन्नद्रव्ये--------कार्यक्षमता (टक्क्यांमध्ये) नत्र---------------३० ते ५० स्फुरद------------१५ ते २५ पालाश------------५० ते ६० जस्त---------------२ ते ५ लोह----------------१ ते २ बोरॉन--..............-१ ते ५ खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय 

  • जमिनीत पुरेसा ओलावा असताना खते द्यावीत. खते जमिनीवर फेकू नयेत.
  • पेरणी करताना खते बियाण्याखाली पेरून द्यावीत.
  • खतमात्रा मुळांच्या सान्निध्यात द्याव्यात.
  • आवरणयुक्त खते/ब्रिकेट्‌स/सुपर ग्रॅन्युलसचा वापर करावा.
  • निंबोळी पेंडीसोबत युरियाचा १ः५ प्रमाणात वापर करावा.
  • पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत खते विभागून द्यावीत.
  • सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा. पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा.
  • तृणधान्य पिकांसाठी (नत्र, स्फुरद, पालाश, गंधक) खतांचा ४:२:२:४ या प्रमाणात, तर कडधान्यासाठी १:२:१:१ या प्रमाणात वापर करावा.
  • माती परीक्षणावर आधारित शिफारशींनुसार खतांचा वापर करावा.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फवारणीद्वारे करावा.
  • पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
  • रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थांसोबतच (कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत आदीसोबतच) करावा.
  • सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा.
  • विविध जिवाणू खतांचा (रायझोबियम, पी.एस.बी., ॲझोटोबॅक्टर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यांस) वापर करावा.
  • समस्यायुक्त, क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारक खतांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीची खते, प्रेसमड, उसाची मळी प्रति हेक्टर ३ टन) वापर करावा.
  • चुनखडीविरहित जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा.
  • मृद्‌ व जलसंधारण पद्धतींचा अवलंब करावा.
  • - डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६ (मृद्‌ विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Monsoon Rain: पुढील ५ दिवस पाऊस कमी; पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

    Crop Damage Compensation : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या ः पालकमंत्री पाटील

    Solar Project : सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज

    Beed Rainfall : बीडमध्ये समाधानकारक पाऊस नाही

    Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

    SCROLL FOR NEXT