Marvel grass for green fodder: Phule Govardhan
Marvel grass for green fodder: Phule Govardhan 
कृषी सल्ला

हिरव्या चाऱ्यासाठी मारवेल गवत : फुले गोवर्धन

डॉ. व्ही. बी. शिंदे, पी. पी. सुराणा

पाण्याची हमखास उपलब्धता असलेल्या बागायती भागात हिरव्या चाऱ्यासाठी मारवेल गवताच्या ‘फुले गोवर्धन’ या जातीची लागवड करावी.लागवडीसाठी ४ × ५ मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करावेत. त्यात दोन ओळीत ४५ सें.मी. तर आळीतील दोन कांड्यामध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. जनावरांना  हिरवा चारा नियमितपणे उपलब्ध होण्यासाठी बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या बागायती भागात एकूण क्षेत्रातील किमान ५ टक्के क्षेत्रामध्ये बहुवार्षिक चारा पिकांची लागवड केल्यास वर्षभर मुबलक हिरवा चारा उपलब्ध होवू शकतो. बहुवार्षिक पिकांची एकदा लागवड केल्यानंतर तीन ते चार वर्षे नियमित चारा मिळतो. त्यामुळे नांगरणी, कोळपणी इत्यादी मशागतीच्या कामांवर हंगामी पिकांमध्ये जसा खर्च करावा लागतो तसा बहुवार्षिक चारा पिकांसाठी करावा लागत नसल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते.  वर्षभर हिरव्या चाऱ्यासाठी मारवेल गवताची लागवड करावी. या गवताला कांडी गवत असेही म्हणतात. फुले गोवर्धन जातीची वैशिष्ट्ये 

  • पाण्याची हमखास उपलब्धता असलेल्या बागायती भागात हिरव्या चाऱ्यासाठी मारवेल गवताची ‘फुले गोवर्धन’ ही बहुवार्षिक जात आहे.
  • भरपूर फुटवे येतात, गोड (ब्रिक्स ७.५०), जास्त पचनीयता (६१.३० टक्के), रुचकर, पौष्टिक, हिरव्यागार चाऱ्याचे अधिक उत्पादन
  • लागवड तंत्र 

  •  मध्यम ते भारी, कसदार व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. एक खोल नांगरट व त्यानंतर एक ते दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
  • उन्हाळा व पावसाळा हा ऋतू या गवताच्या वाढीस अधिक पोषक असतो. सरासरी ३०-३१ अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ उत्तम होते. जर तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली गेले तर त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. पावसाच्या हलक्या सरी व त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश या पिकाच्या वाढीस फायदेशीर ठरतो.
  •  ‘फुले गोवर्धन’ या गवताची लागवड डोळे असणाऱ्या कांड्या लावून करावी लागते. साधारणपणे २ ते २.५ महिने वाढू दिलेल्या कांड्यापासून लागवड केल्यास त्या चांगल्या फुटतात. 
  •  लागवडीसाठी ४ × ५ मीटर लांबीचे सपाट वाफे तयार करावेत. त्यात दोन ओळीत ४५ सें.मी. तर आळीतील दोन कांड्यामध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. दोन डोळे असलेली कांडी एक डोळा जमिनीत व एक डोळा जमिनीवर राहील अशा रीतीने लावावे.
  •  ४५ × ३० सें.मी. अंतरावर प्रत्येक ठिकाणी दोन डोळ्याची एक कांडी लावल्यास हेक्टरी ७५००० कांड्या लागतात.
  • पाण्याची उपलब्धता मुबलक असल्यास थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही लागवड करता येते. पावसाळ्यात जून ते ऑगस्ट तर उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात लागवड केल्यास पिकाच्या वाढीसाठी व स्थिरतेसाठी हा कालावधी योग्य ठरतो.
  • हेक्टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत मशागतीच्या वेळेस जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी ६० किलो नत्र (१३० किलो युरिया), ४० किलो स्फुरद (२५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि २० किलो पालाश (३० किलो 
  • म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. भरपूर  चारा उत्पादनासाठी प्रत्येक कापणीनंतर २५ किलो नत्र (५० किलो युरिया) द्यावे.
  • पावसाळ्यात गरज भासल्यास तर उन्हाळ्यात १०-१५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देवून शेत तणविरहीत ठेवावे.
  • ''फुले गोवर्धन'' या गवताची पहिली कापणी लागवडीपासून ५०-६० दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या दर ४५-५० दिवसांनी कराव्यात. वर्षभर ६-८ कापण्या सहज घेता  येतात.
  • उत्तम व्यवस्थापन केल्यास  प्रति  हेक्टरी ६० ते ८० टन हिरवा चारा प्रति वर्षी ६-८ कापण्याद्वारे सहज मिळू शकतो.
  • - डॉ.व्ही.बी.शिंदे, ८२७५४४०७१५ (गवत संशोधन योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि.नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT