Contract farming 
कृषी सल्ला

करारशेतीसाठी महत्त्वाच्या बाबी

सध्याच्या विक्रीसाखळीद्वारे शेतीमालाची विक्री होत असल्यामुळे जास्त नफा हा मध्यस्थांना होतो, पर्यायाने शेतीमाल विक्रीत मध्यस्थ श्रीमंत झाले असून, शेतीमाल पिकविणारा शेतकरी त्याच अवस्थेत राहिल्याचे निदर्शनास आल्याचे चित्र दिसते. या सर्व दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची विक्री योग्य किमतीला होणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी करार शेती हा चांगला पर्याय आहे.

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

सध्याच्या विक्रीसाखळीद्वारे शेतीमालाची विक्री होत असल्यामुळे जास्त नफा हा मध्यस्थांना होतो, पर्यायाने शेतीमाल विक्रीत मध्यस्थ श्रीमंत झाले असून, शेतीमाल पिकविणारा शेतकरी त्याच अवस्थेत राहिल्याचे निदर्शनास आल्याचे चित्र दिसते. या सर्व दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची विक्री योग्य किमतीला होणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी करार शेती हा चांगला पर्याय आहे.  सध्या शेतकरी कोणतीही हमी नसताना केवळ अंदाज बांधून पीक उत्पादन घेतो. त्यामुळे उत्पादनास योग्य किंमत मिळेलच असे नाही. कधी पुरवठा जास्त झाल्यामुळे किंमत कमी होतात त्यामुळे शेतकऱ्यास फारच कमी किमतीत माल विकावा लागतो. कधी कधी तर उत्पादन खर्चही मिळत नाही. शेतीमाल उत्पादन व विक्री यामधील समस्यांचे वर्गीकरण केले तर  विक्रीमधील समस्या या मोठ्या प्रमाणात म्हणजे ९० टक्के, तर उत्पादन  समस्या या १० टक्के एवढ्या असल्याचे  बऱ्याच अभ्यासाअंती आढळून आले आहे. सध्याच्या विक्रीसाखळीद्वारे शेतीमालाची विक्री होत असल्यामुळे जास्त नफा हा मध्यस्थांना होतो, पर्यायाने शेतीमाल विक्रीत मध्यस्थ श्रीमंत झाले असून, शेतीमाल पिकविणारा शेतकरी त्याच अवस्थेत राहिल्याचे निदर्शनास आल्याचे चित्र दिसते. या सर्व दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची विक्री योग्य किमतीला होणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी करार शेती हा चांगला पर्याय आहे.  करार शेतीचे फायदे

  • सर्वसामान्य शेतकरी चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन घेऊ शकतो.
  • गट शेती असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून निर्यातक्षम उत्पादन घेता येते.
  • शेतीला व्यावसायिकतेची जोड मिळते.
  •  बँकांना कर्जपुरवठ्यावर शेतकऱ्यांचा समूह असल्यामुळे योग्य नियंत्रण आणि लक्ष ठेवता येते. 
  • एकमेकांतील सामंजस्य आणि विश्‍वासामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीचा फायदा हा कंपनी व शेतकऱ्यांना घेता येतो.
  • शेती व्यवसायामधील किमतीच्या बाबतीत जोखीमही कमी करता येते.
  • बँकांना कर्जपुरवठा सुलभ रीतीने करता येतो.
  • सेंद्रिय शेतीला करारशेतीमुळे चांगल्या संधी निर्माण होतात.
  • नवीन शेती प्रक्रिया उद्योग यांच्या निर्मितीस चालना मिळून रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतात.
  • पर्यायाने भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या संधीचा फायदा शेतकरी व कंपनीला होतो.
  • करारशेतीच्या यशस्वितेसाठी महत्त्वाच्या बाबी

  • प्रायोजकांमार्फत उत्पादनांच्या विक्रीकरिता योग्य बाजारपेठेची निवड.
  • शेतकऱ्यांची जोखीम स्वीकारण्याची तयारी.
  • पीक व वाहतुकीच्या दृष्टीने योग्य जमिनीची निवड.
  • योग्य शेतकऱ्यांची निवड.
  • विविध पिकांनुसार कराराच्या पद्धती.
  • कृषी मालाच्या खरेदीची व शेतकऱ्यांना वजन व दर्जा तपासण्याची सुविधा.
  • प्रायोजकांमार्फत विस्तार कार्यासाठीचा कर्मचारी वर्ग, पीक व स्थानिक वातावरणाशी समरस. 
  •  स्थानिक माहिती व अडचणीच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा प्रसार.
  • करार शेतीमध्ये अडथळे

  • करार शेती उत्पादनापुरतीच मर्यादित.
  • जरी बाजारामध्ये कमी दरात चांगल्या निविष्ठा मिळत असल्या तरी कंपनीने दिलेल्या निविष्ठांची खरेदी करावी लागते.
  • कंपनीद्वारे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात निविष्ठांचा पुरवठ्यात अडथळा.
  • जास्त दराचा विमा कंपनीद्वारे बंधनकारक करणे.
  • बाजारामध्ये मंदी असेल तर विकलेल्या मालाचे पैसे उशिरा देणे.
  • शेतीमाल गुणवत्तेची जास्तीची मापके लावून बाजारामध्ये दर कमी असताना कमी खरेदी करणे.
  • जोखीम

  •     नवीन  पीक.
  •     गुणवत्ता पूर्ण उत्पादन.
  •     गुणवत्ता प्रमाणकात कंपनीद्वारे बदल करणे.
  •     तंत्रज्ञानाची माहिती कमी प्रमाणात मिळणे.
  •     बाजारातील बदल.
  •     कंपनीने करार मोडणे.
  •     कमी दरांमध्ये विमा सुविधा नसणे.
  • करार करतानाची काळजी

  • करार करण्यास इच्छुक असणाऱ्या कंपनीची शक्य तेवढी सर्व माहिती मिळवावी. ज्या शेतीमालाच्या उत्पादनासाठी आपण करार करणार आहोत, त्यासंबंधीची माहिती ही कृषी खाते, कृषी विद्यापीठ तसेच संशोधन संस्था यांच्याकडून मिळविणे आवश्यक आहे.
  • करार करणारी कंपनी जर अनुभवी असेल तर पूर्वी ज्या भागातील शेतकऱ्यांबरोबर कंपनीने करार केला होता, त्या शेतकऱ्यांचे अनुभव नवीन शेतकऱ्यांनी माहिती करून घेणे आवश्यक आहे. 
  • शेतकऱ्यांनी सर्व माहिती घेतल्यानंतरच करार शेतीसंबंधी नियम व अटी तयार कराव्यात. त्यामध्ये किंमत, निविष्ठांचा पुरवठा दलाली, गुणवत्तेची प्रमाणके याबाबत माहिती कंपनीकडून घ्यावी, त्यानंतर करार करावा.
  • कंपन्यांना बटाटा करारशेतीतील संधी

  • बटाटा करार शेतीमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध स्तरांवर काम करण्यास संधी उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने बटाटा बियाणे, बियाणे खरेदी, साठवणूक व विक्री या व्यवसायांमध्ये मोठा वाव असून, शेतकरी उत्पादक कंपनीने वितरित केलेल्या बियाण्यातून उत्पादित शेतीमालाची खरेदी करून खासगी प्रक्रियादार कंपन्यांना विक्री करण्यासाठीच्या पुरवठा साखळीमध्ये सहभागी होता येऊ शकते. 
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांनी देशातील नामांकित बटाटा प्रक्रियादार खासगी कंपन्यांशी करार करणे अपेक्षित असून, सदर कंपन्यांची पुरवठादार म्हणून (व्हेंडर) नोंदणी करावी. संचालक मंडळाने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा.
  • - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०.  (राज्य कृषी व्यवसाय व पणन तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Solapur Logistics Hub: सोलापूर देशाचे ‘लॉजिस्टिक हब’ बनणार

    Urea Black Market: अनुदानित ५८ टन युरियाची काळ्या बाजारात विक्री

    Gokul Milk Price Hike: अमूल पाठोपाठ गोकुळ दूध दरात २ रुपयांची वाढ

    Shaktipeeth Highway Project: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनात ‘एनए’चे रॅकेट ?

    Car Cargo Project Issue: ‘कार कार्गो’ प्रकल्प कागदावरच

    SCROLL FOR NEXT