नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत बागायती जवसाची लागवड करता येते. 
कृषी सल्ला

हमखास उत्पादन देणारे पीक : जवस

महाराष्ट्रात रब्बी हंगामातील जवस हे महत्त्वाचे तेलबिया पीक असून, त्याचा तेल व धागा निर्मितीसाठी उपयोग होतो. जिरायती, बागायतीसाठी चांगले पीक आहे. यास थंड हवामान उपयुक्त असून यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम खोल काळी जमीन फायदेशीर ठरते.

डॉ. हेमंत पाटील, खेमराज सोनवणे, डॉ दत्तात्रय कुसळकर 

महाराष्ट्रात रब्बी हंगामातील जवस हे महत्त्वाचे तेलबिया पीक असून, त्याचा तेल व धागा निर्मितीसाठी उपयोग होतो. जिरायती, बागायतीसाठी चांगले पीक आहे. यास थंड हवामान उपयुक्त असून यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम खोल काळी जमीन फायदेशीर ठरते.  उतेरा, मिश्र किंवा आंतरपीक 

  • भात पीक काढणी अगोदर उतेरा पीक म्हणून पश्‍चिम घाट विभाग, तसेच मराठवाडा व विदर्भात हे पीक घेतले जाते. या पद्धतीत भात काढणीआधी आठ दिवस भात पिकामध्ये फोकून जवस पेरणी करतात. त्यामुळे उर्वरित ओलावा व कोणत्याही खतमात्रेशिवाय जवसाचे तीन ते चार क्विंटल प्रति हेक्‍टरपर्यंत हमखास उत्पादन मिळते. 
  • मिश्र पिकांमध्ये जवस + मसूर + वाल + हरभरा ही पद्धती ठेवल्यास त्याचा उताराही चांगला मिळतो.  
  •  हरभरा, गहू, करडई तसेच मोहरी या पिकांमध्ये जवस आंतरपीक म्हणून घेतल्यास फायदेशीर ठरू शकते. 
  • पोषकता जवसामध्ये प्रथिने २०.२४ टक्के,  तेल ३७.४२ टक्के,  कर्बोदके १५.२९ टक्के, तंतुमय पदार्थ ५.९ टक्के आहेत. जवस तेलात ५८ टक्के ओमेगा-३ मेदाम्ले, अँटिऑक्सिडंट असून, ते ह्रदय विकार, रक्तदाब, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड यांच्या नियंत्रणात मदत करतात. संधिवातासाठी तेल उपयुक्त. जमीन

  • मध्यम खोल, काळी, ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. 
  • पेरणीपूर्वी खोल नांगरट करून दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. कुळवणी पूर्वी पाच ते सहा टन प्रति हेक्‍टरी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.बियाण्यांची उगवण चांगली होते. 
  • पेरणीची वेळ गादमाशी व मर रोगाचा प्रादुर्भाव कमी राखणे, आणि अपेक्षित उत्पादनासाठी पेरणी शक्यतो १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. बीज प्रक्रिया

  • मर व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी - दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा तीन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे. 
  • त्यानंतर तीन तासांनी २५ ग्रॅम जिवाणू खते व स्फुरद विरघळणारे जिवाणू २० ग्रॅम प्रति किलो बियाणे याची बीजप्रक्रिया करावी. 
  • पेरणी

  • तीन ते चार सेंमीपेक्षा खोल करू नये. 
  • आवश्यकता पडल्यास हेक्‍टरी चार लाख रोपे बियाणे उत्पादनासाठी आणि पाच लाख रोपे धाग्यासाठी प्रति हेक्‍टरी राहतील अशी व्यवस्था विरळणीद्वारे करावी. 
  • आंतरपीक पद्धतीमध्ये जवस + मोहरी (५:१),  जवस + गहू (१:३), जवस + हरभरा  (४:२) या पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते. 
  • पश्चिम घाट विभागांमध्ये जवस+ वाल, जवस + मसूर, जवस + हरभरा तसेच मिश्र पीक पद्धतीमध्ये समसमान जवस + वाल + हरभरा + मसूर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दिसून आली आहे.
  • बियाणे  प्रति हेक्‍टरी २५ किलो बियाणे वापरावे. दोन ओळींतील अंतर ३० सेंटिमीटर ठेवून पाभरीने पेरणी केल्यास झाडांची संख्या समप्रमाणात मिळते. सुधारित वाण तेलबिया व धागा या दोन्हींसाठी शिफारशीनुसार वाणांची निवड करावी.

    वाण (बियांसाठी)  कालावधी  (दिवस) उत्पादन (किलो/ हेक्टर)   वैशिष्ट्ये
    हिमालिनी   १५० - १७५  १३००     भुरी, तांबेरा व मर रोगास प्रतिकारक, भात पिकानंतर घेण्यास उपयुक्त
    एन एल ११२  ११८ - १२३ १५००      बागायतीसाठी, तेलाचे प्रमाण ४१ टक्के 
     एन एल ९७ ११५ - १२०  ६०० - १२००  बागायतीसाठी, तेलाचे प्रमाण ४४ टक्के 
    एन एल १६५   ११६ - १२१    १६०० - २३०० बागायतीसाठी, तेलाचे प्रमाण ४१ टक्के 
    पुसा - २   १५० - १७५    १३००   तांबेरा रोगास प्रतिकारक, पाण्याचा ताणास सहनशील
    पुसा - ३  १२० - १३५     ८००    कोरडवाहूसाठी, बागायतीत खतांना उत्तम प्रतिसाद
    श्वेता   १३० -१३५  ९००   कोरडवाहूसाठी 
    किरण   १३० - १३५     ७५०   कोरडवाहूसाठी, भुरी, तांबेरा व मर रोगास प्रतिकारक.

    टीप

  • दुहेरी उद्देशासाठी (बिया व धाग्यासाठी) सौरव व जीवन या वाणांची लागवड करावी. 
  • भात काढणीनंतर जवाहर- १७ व  सुरभी या वाणांची लागवड करावी.
  • रासायनिक खतांची मात्रा

  • कोरडवाहू लागवडीसाठी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी पेरणीच्या वेळेस द्यावे. 
  • बागायती लागवडीसाठी ६० किलो नत्र + ३० किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. यापैकी अर्धे नत्र ३० किलो + संपूर्ण स्फुरद (म्हणजेच १५० किलो,  २०:२०:०० नत्र: स्फुरद:पालाश किलो मिश्रखत) पेरणी वेळेस व उर्वरित अर्धी नत्र मात्रा ३० किलो (म्हणजेच ६५ किलो युरिया) ३० ते ३५ दिवसांनी पहिल्या ओलितासोबत द्यावी.
  • लोह व जस्त यांची कमतरता असलेल्या जमिनीत पेरणीवेळी पाच किलो फेरस सल्फेट व पाच किलो झिंक सल्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे.
  • मिश्र पीक व उतेरा जवस

  • भात पिकाच्या काढणीनंतर बरेच शेतकरी पश्‍चिम घाट विभागांमध्ये रब्बी हंगामामध्ये पीक घेत नाहीत अशा परिस्थितीत विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी येथील कृषी विद्या विभागाने शेतकऱ्यांसाठी खालील प्रमाणे मिश्र पीक व उतेरा पीक पद्धतींच्या शिफारशी दिलेल्या आहेत.
  • भात पिकानंतर उपलब्ध ओलाव्यावर मिश्र पिके घेणे फायदेशीर ठरते. जवस व कडवा वाल यांची प्रत्येकी ५० टक्के झाड संख्या ठेवल्यास भाताइतकेच उत्पादन (२०.१२ क्विंटल/ हेक्टरी) मिळाले आहे.
  • पश्‍चिम घाट विभागात अधिक आर्थिक फायदा मिळवण्यासाठी उपलब्ध ओलाव्यावर व उतेरा पीक पद्धतीत भात पिकानंतर, जवस पिकाची लागवड करण्याची शिफारस आहे. त्यात शिफारशीत खत मात्रेच्या ७५ टक्के खत (१९:३८:०० किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्‍टरी) देण्याची शिफारस आहे. 
  • सिंचन व्यवस्थापन

  • पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाणी दिल्यास उत्पादनात दुपटीने वाढ होते. पिकास पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पहिले पाणी द्यावे. दुसरे पाणी ५५ दिवसांनी व तिसरे पाणी ७५ दिवसांनी बागायती जवसासाठी द्यावे.
  • सुरुवातीचे ३० दिवस तणांसाठी संवेदनक्षम असून, पहिल्या ३० दिवसांपर्यंत पीक तणमुक्त ठेवावे. 
  • पेरणीनंतर २० दिवसांनी पहिली खुरपणी, तर गरज पडल्यास ३५ ते ४० दिवसांनी दुसरी खुरपणी करावी. पिकाच्या दोन ओळींत कोळप्याच्या साह्याने आंतरमशागत करून पीक तणमुक्त ठेवावे.
  • - ०२५५३२४४०१३/३२ विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी, जि. नाशिक

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

    Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

    Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

    Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

    Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

    SCROLL FOR NEXT