Training of farmers in research field 
कृषी सल्ला

प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजना

महाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात पाच किंवा तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात.

मिलिंद आकरे

महाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात पाच किंवा तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कृषी, सहकार, प्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, पशुसंवर्धन, कृषी विपणन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. 

शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गटासाठी प्रशिक्षण 

  • महाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात पाच किंवा तीनदिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम.  
  • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कृषी, सहकार, प्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, पशुसंवर्धन, कृषी विपणन अशा विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. 
  • प्रशिक्षणाच्या कामकाजाच्या यशस्वितेच्या आधारे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाअंतर्गत कृषी कौशल्य परिषद (ASCI) प्रशिक्षण यंत्रणा म्हणून महामंडळाची संलग्न संस्था म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. नाबार्डमार्फत रिसोर्स स्पोर्ट एजन्सी म्हणून महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. 
  • प्रशिक्षणाचे उद्देश

  • शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मूल्यवर्धन व उत्पन्नाचे स्रोत वाढवणे.
  • ग्रामीण भागात उद्यमशीलता व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे.
  • सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांचे आर्थिक बळकटीकरण व रोजगारनिर्मिती. 
  • सहकारी प्रक्रिया उद्योगांना कर्ज व गुंतवणुकीच्या स्वरूपात वित्तपुरवठ्याबाबत मार्गदर्शन. कृषिमालाची निर्यातवृद्धीबाबत मार्गदर्शन. 
  • कृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापन

  • राज्यातील सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून त्यांचे सभासद शेतकरी यांच्यासाठी “कृषी निविष्ठा पुरवठा व्यवस्थापन” उपक्रम राबविण्यात येत आहे.
  • उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांच्यामार्फत कृषी निविष्ठा (खते) पुरवठ्याचा परवाना प्राप्त झाला आहे. तसेच इफ्को आणि आरसीएफ यांच्यामार्फत महामंडळास कृषी निविष्ठा (खते) पुरवठ्यासाठी “राज्य वितरक” म्हणून मान्यता आहे. 
  • सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट शेतकरी सभासदांपर्यंत कृषी निविष्ठा उपलब्ध करण्याचा महामंडळाचा मानस आहे.
  • महामंडळाचे सामाजिक विकासातील योगदान

  • सहकारी संस्थांचा विकास व्हावा, यामधून सभासद / शेतकरी तसेच संबंधित सर्व घटकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न . 
  • शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी, दर्जेदार उत्पादनासाठी तसेच उत्पादनाच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यासाठी महामंडळामार्फत विविध उपक्रम, योजना, प्रकल्प व कार्यक्रम राबवले जात आहेत. 
  • राज्यात नाबार्डच्या सौजन्याने ३० शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची क्षमता बांधणी करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रास्त दरात रासायनिक खते व कृषिमालाच्या विक्री बाबत बाजार जोडणी.
  • पुणे, मुंबई, ठाणे येथील गृहनिर्माण संस्थामध्ये भाजीपाला विक्री व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळत आहेत. 
  • सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी / महिला बचत गट यांचे कडधान्य, डाळी, तसेच प्रक्रियाकृत पदार्थांच्या विक्रीसाठी क्रॉपशॅाप (सहकारी भांडार) हे शहरातील मोठ्या गृहनिर्माण संस्थामध्ये स्थापन करण्यात आले आहे. त्याचा फायदा उत्पादक व ग्राहकांना होत आहे. 
  • स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत १० सहकारी संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या गोदाम नूतनीकरणाचा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झालेली आहे. या माध्यमातून गोदाम पावती योजना राबविण्यात येणार आहे. २१ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मूल्यसाखळी विकास. 
  • ग्रामीण भागातील युवकांना रोजगारांच्या संधी निर्मिती करण्यासाठी व यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्यासाठी जलसमुद्धी योजनेअंतर्गत एकूण ३१८ जेसीबीचे वाटप करण्यात आले. 
  • महामंडळाची पुढील वाटचाल 

  • शेतकरी उत्पादक कंपनीची क्षमता बांधणीपासून त्यांच्या मालाची विक्री उत्पादन व्यवस्थेसाठी मार्केट लिंकेजेस विकसित करण्याचे काम. 
  • सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा व खेळत्या  भांडवलाची उपलब्धता. 
  • महामंडळामार्फत नियोजन 

  • विविध कार्यकारी सहकारी संस्था व गृहनिर्माण संस्थाचे डिजिटायझेशन.
  • समुदाय आधारित संस्थांच्या कृषी उत्पादनासाठी साखर संकुल येथे मध्यवर्ती भांडार उभारणी करणे. 
  • साखर संकुल येथे शेतकऱ्यांच्या कृषिमालासाठी क्रॉपशॉपची उभारणी. 
  • सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे शेतकरी बाजार विकसित करणे.
  • सहकारी संस्थांसाठी सिबील क्रेडिट रेटिंगचा उपक्रम राबविणे.
  • सहकारी संस्थांच्या गोदामांचे डिजिटायझेशन करणे.
  • मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून सहकारी संस्थांची पायाभूत उभारणी. 
  • सहकारी संस्थासाठी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जसे की एनसीडीएक्स, ई-नाम, स्टार ॲग्रो. 
  • संपर्क- हेमंत जगताप,   ८२७५३७१०८२ (लेखक  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय  संचालक आहेत)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

    Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

    Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

    Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

    SCROLL FOR NEXT