Farmer Planning Crop: Shevanti 
कृषी सल्ला

शेतकरी नियोजन पीक : शेवंती

माझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक पद्धतीने फुलशेती करतो. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत आहेत. पण सण समारंभाच्या काळात पांढऱ्या, पिवळ्या शेवंतीला चांगली असते. त्यामुळे गणेशत्सोव, दसरा व दिवाळी या काळात शेवंती फुले बाजारात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

भाऊसाहेब दोरगे

माझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक पद्धतीने फुलशेती करतो. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत आहेत. पण सण समारंभाच्या काळात पांढऱ्या, पिवळ्या शेवंतीला चांगली असते. त्यामुळे गणेशत्सोव, दसरा व दिवाळी या काळात शेवंती फुले बाजारात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. शेतकरी :   भाऊसाहेब दोरगे गाव : यवत (दोरगेवाडी) ता. दौंड, जि. पुणे शेवंती क्षेत्र :  १ एकर माझ्याकडे एकूण १० एकर शेती असून, पारंपरिक पद्धतीने फुलशेती करतो. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे काही प्रमाणात अडचणी येत आहेत. पण सण समारंभाच्या काळात पांढऱ्या, पिवळ्या शेवंतीला चांगली असते. त्यामुळे गणेशत्सोव, दसरा व दिवाळी या काळात शेवंती फुले बाजारात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार शेवंती लागवड केली जाते. विविध वाणांची निवड करून लागवडीवर भर देत आहे. चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यास अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. शेवंतीमध्ये भाग्यश्री (पांढरी), पौर्णिमा, गुलछडी या फुलाचे उत्पादन घेतले जाते. मी शेवंती लागवडीसाठी भाग्यश्री वाणाची निवड केली आहे. लागवड साधारणपणे १२ मार्चच्या दरम्यान केली आहे. मागील पंधरा दिवसांतील कामकाज 

  • लागवडीपूर्वी एकरी ४ ट्रॉली शेणखत टाकण्यात आले आहे. त्यावर रोटर मारून बेड तयार केले आहेत.
  • शेवंती लागवडीसाठी ४ फुटांचे बेड तयार करून सव्वा फुटावर लागवडीचे नियोजन केले आहे.
  • शेवंती लागवडीसाठी भाग्यश्री या वाणाची थेऊर येथील नर्सरीमधून खरेदी करण्यात आली. लागवड मजुरांमार्फत करण्यात आली.
  • लागवडीनंतर ५ दिवसांनी ड्रीपद्वारे आणि पंपाद्वारे बुरशीनाशके देण्यात आली.
  • लागवडीच्या १० दिवसांनी रासायनिक खतांची मात्रा दिली आहे.
  • वाढीच्या काळात रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. गरजेनुसार बुरशीनाशकाची फवारणी केली आहे.
  • सध्या रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत.
  • सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीची निवड करण्यात आली आहे. रोपांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे पाणी दिले जाते.
  • पुढील पंधरा दिवसांचे नियोजन 

  • आगामी काळात गरजेनुसार खुरपणी करून तणनियंत्रण केले जाईल.
  • एप्रिलच्या अखेरीस शेवंतीच्या राजा या वाणाची २ एकरांवर लागवड करण्याचे नियोजन आहे.
  • वाढते तापमान आणि पाण्याची अंदाज घेऊन लागवडीचे नियोजन केले जाईल.
  • फुलांचा आकार मोठा राहण्यासाठी सेंद्रिय व रासायनिक खतांच्या वापरावर भर दिला जाईल.
  • दसरा व दिवाळीमध्ये फुलांचे उत्पादन होण्याच्यादृष्टीने नियोजन सुरू असून, शेवंतीचे ५ ते ६ टनांपर्यंत उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  • झाडांची उंची वाढण्यासाठी खतांची फवारणी करणार आहे.
  • फुलांचे चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी नियोजनानुसार विविध कामे करण्यावर विशेष भर दिला जातो.
  • - भाऊसाहेब दोरगे, ९४२३१००७२२

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

    Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

    Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

    Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

    Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

    SCROLL FOR NEXT