संदीप पाटील यांची केळी बाग. थंडीमध्ये खत व सिंचन व्यवस्थापनावर भर असतो. 
कृषी सल्ला

Banana Crop Management Update : शेतकरी नियोजन - पीक केळी

यंदा टप्प्याटप्प्याने केळीची लागवड केली आहे. माझ्याकडे जमिनीचे काळी मध्यम, पाण्याचा निचरा करणारी व काळी कसदार असे प्रकार आहेत. त्यानुसार सर्व बाबींचे नियोजन करतो. निर्यातीचा उद्देश ठेवून केळीचे पीक मी घेत आहे. या केळीच्या व्यवस्थापनातील ठळक बाबी अशा...

Chandrakant Jadhav

यंदा टप्प्याटप्प्याने केळीची लागवड केली आहे. माझ्याकडे जमिनीचे काळी मध्यम, पाण्याचा निचरा करणारी व काळी कसदार असे प्रकार आहेत. त्यानुसार सर्व बाबींचे नियोजन करतो. निर्यातीचा उद्देश ठेवून केळीचे पीक मी घेत आहे. या केळीच्या व्यवस्थापनातील ठळक बाबी अशा...

शेतकरी :  संदीप सुभाष पाटील

गाव :  वढोदा, ता.चोपडा, जि.जळगाव

एकूण क्षेत्र :  ३५ एकर

केळीखालील क्षेत्र :  १८ एकर (३० हजार केळी झाडे)

माझी वढोदा (ता. चोपडा) येथे तापी नदीच्या लाभक्षेत्रात ३५ एकर जमीन आहे. चार कूपनलिका आहेत. केळी प्रमुख पीक असून, १८ एकरांमध्ये घेतो. त्यात मृग बहर, कांदेबाग व पिलूबाग केळी आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये सहा एकरांत सहा बाय पाच फूट अंतरावर कांदेबाग केळी लागवड केली आहे. त्यासाठी १० हजार टिश्युकल्चर रोपे लागली.

बेवडसाठी पपई, कलिंगड व इतर पिके घेतो. पीक फेरपालटीवर भर आहे. यंदा टप्प्याटप्प्याने केळीची लागवड केली आहे. माझ्याकडे जमिनीचे काळी मध्यम, पाण्याचा निचरा करणारी व काळी कसदार असे प्रकार आहेत. त्यानुसार सर्व बाबींचे नियोजन करतो. निर्यातीचा उद्देश ठेवून केळीचे पीक मी घेत आहे. या केळीच्या व्यवस्थापनातील ठळक बाबी अशा... खतांची मात्रा पूर्ण करण्यावर भर

  1. सध्या थंडीचा काळ सुरू झाला आहे. तापमान कमी अधिक होत आहे. थंडीपासून बचावासाठी खते, पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

  1. कांदेबाग केळी तीन महिन्यांची झाली आहे. या केळीमध्ये मजुरांच्या मदतीने तणनियंत्रण व बैलांकरवी दोन सरीआड आंतरमशागतदेखील करून घेतली आहे.

  1. सिंचनासाठी गादीवाफ्यावर दोन लॅटरल आहेत.

  1. खत व्यवस्थापनात दर चौथ्या दिवशी प्रति हजार रोपांसाठी पाच किलो युरिया, सहा किलो पोटॅश व दोन किलो मॅग्नेशिअम देत आहे. दर आठ दिवसांत प्रति हजार झाडांसाठी कॅल्शिअम नायट्रेट तीन किलो, बोरॉन २०० ग्रॅम देत आहे. ड्रीपद्वारे फर्टिगेशन करीत आहे.

  1. थंडीच्या दिवसांत लहान केळी बागेत कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) येण्याची शक्यता असते. या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडींच्या नियंत्रणावर प्राधान्याने लक्ष देतो. फवारणीचे दर १५ दिवसाआड या प्रमाणे नियोजन बसवलेले आहे.

  1. तापमान कमी झाले असून, पुढे थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या काळात केळी बागेला रोज अडीच तास ठिबकद्वारे सिंचन करत आहे.

  1. केळी उत्पादनासाठी के.बी.पाटील यांचे मार्गदर्शन मिळते.

पुढील १५ दिवसांतील नियोजन

  • सर्व केळी बागांत सिंचनाबाबत काटेकोर लक्ष दिले जाईल.
  • कांदेबाग केळी किंवा लहान केळी पिकाला थंडीमध्ये कॅल्शिअम नायट्रेट व सल्फरची योग्य मात्रा दिली जाईल.
  • कुकुंबर मोझॅक विषाणूबाबत सतत निरीक्षण सुरू आहेच. त्यासंबंधी प्रतिबंधात्मक फवारण्या करून घेतल्या जातील.
  • तणनियंत्रण पुन्हा एकदा करून घेतले जाईल.
  • थंडी किंवा ढगाळ वातावरणात करपा रोगही येतो. त्यासाठी बुरशीनाशकांची प्रतिबंधात्मक फवारणी केली जाईल.
  • ढगाळ वातावरणात अळीचाही प्रकोप पिकात दिसून येतो. त्याकडे लक्ष आहे.
  • पुढे आवश्यकतेनुसार सिंचन रोज तीन तास करण्यात येईल.
  • - संदीप पाटील, ९०७५४५७६६५

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

    Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

    Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

    Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

    Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

    SCROLL FOR NEXT