It is important to irrigate the wheat crop during the critical stages of growth. 
 बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर उर्वरित नत्राची मात्रा द्यावी. पीक वाढीच्या टप्यानुसार पाणी द्यावे. ज्वारी पिकाला संरक्षित पाणी मिळाल्याने निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. कणसांचा आकार मोठा होण्यास मदत होते.       महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत करण्याची शिफारस केली आहे.पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी एक क्विंटल उत्पादन कमी येते.त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेल्या गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही. तरी देखील खरिपातील कांदा, ऊस काढणीनंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करतात. त्यादृष्टीने गव्हाचे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व आंतरमशागतीचे नियोजन आवश्यक आहे.       पाणी व्यवस्थापन     भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या सहा पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ पाळ्या द्याव्यात, तर हलक्या जमिनीस १०-१२ दिवसाच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात.
ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास आणि एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढील प्रमाणे पाणी द्यावे.
 आंतरमशागत     पेरणीनंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तण नियंत्रण करावे. गव्हात चांदवेल, हरळी यांसारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो. जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.       उर्वरित नत्राची मात्रा  
 ज्वारीला द्या संरक्षित पाणी    बहुतांश तालुक्यात ज्वारीच्या पेरण्या ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या आहेत. सध्या ज्वारीची पिके पोटरीत तर काही ठिकाणी फुलोऱ्यात आहे. ज्वारी पोटरीत आल्यापासून दाणे भरण्यापर्यंतच्या काळात जास्त ओलाव्याची गरज असते. या काळात ओलावा कमी पडल्यास पीक उत्पादनात फारच घट येते.      साधारणपणे ज्वारीची पेरणी केल्यानंतर ५० ते ५५ दिवसांनी पीक पोटरीत येते. या वेळी कणीस ताटातून बाहेर पडण्याच्या अवस्थेत असते. पिकांची वाढ शेवटच्या पानांपर्यंत झालेली दिसून येते. अशा वेळी ज्यांच्याकडे पाण्याची सोय असेल त्यांनी पाणी द्यावे. पाणी मिळाल्याने ज्वारी निसवण्याची प्रक्रिया पूर्ण होते. अन्नद्रव्ये ताटातून कणसात जाण्यासाठी मदत होते. कणसांचा आकार मोठा होण्यास मदत होते.
 पाणी देण्याच्या अवस्था     १) जोमदार वाढीचा काळ (पेरणीनंतर २८ ते ३० दिवस)   २) पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी )   ३) पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी)   ४) दाणे भरण्याचा काळ (पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस)
 संपर्क : डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९   (एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)