The use of organic matter is beneficial for increasing soil fertility. 
कृषी सल्ला

एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन

पिकांसाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने केले तरच शाश्‍वत शेती आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन साध्य होण्यास मदत होईल. माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार खतांचा वापर करून अन्नद्रव्यांचे संतुलन साधावे.

डॉ. हरिहर कौसडीकर

पिकांसाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने केले तरच शाश्‍वत शेती आणि जमिनीचे आरोग्य संवर्धन साध्य होण्यास मदत होईल. माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार खतांचा वापर करून अन्नद्रव्यांचे संतुलन साधावे. कमी होणारे सेंद्रिय पदार्थ तसेच सूक्ष्मजीव आणि गांडुळे यांचा अभाव असल्यास जमीन मृतवत होते. माती परीक्षण केल्याखेरीज तिच्या गुणधर्माविषयी आकलन होत नाही. रासायनिक खतांचा ज्या प्रमाणात वापर होत आहे, त्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन वाढत नाही. जमिनीत दिलेली रासायनिक खते पिकांना मिळतीलच असे नाही. काही प्रमाणात अन्नद्रव्ये पीक वापरतात, काही पाण्याबरोबर वाहून जातात, काही जमिनीत निचरा होतात, तर काही नत्रयुक्त खते वाफेत रूपांतर होऊन उडून जातात. त्यामुळे शेतकरी जास्त प्रमाणात खतांचा वापर करतात. यामुळे जमिनीत रासायनिक प्रदूषणाला सुरुवात होते. पीक पोषणाचा समतोल बिघडतो. जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन जातींचा पीक पद्धतीत वापर, सेंद्रिय खतांच्या वापराचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज, त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार, सूक्ष्म अन्नद्रव्ये विरहित मुख्य अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर इत्यादी घटकांमुळे सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेची समस्या तयार झाली आहे. यामुळे पिकांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. खतांची कार्यक्षमता वाढविण्याचे पर्याय 

  • खते जमिनीवर फेकू नयेत. योग्य ओलावा असताना द्यावी.
  • पेरणी करताना खते बियाणाखाली पेरून द्यावीत.
  • खत मात्रा मुळांच्या सान्निध्यात द्यावी.
  • आवरणयुक्त खते, ब्रिकेट्स, सुपर ग्रॅन्यूलसचा वापर करावा.
  • निंबोळी पेंड सोबत युरिया हा १ : ५ प्रमाणात वापर करावा.
  • खते पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत विभागून द्यावीत.
  • सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा.
  • पाण्याचा अनियंत्रित वापर टाळावा.
  • खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या पद्धती 

  • माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार खतांचा वापर करून अन्नद्रव्यांचे संतुलन साधावे.
  • रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थासोबत (कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत) करावा.
  •  तृणधान्य पिकांसाठी ४:२:२:१ (नत्र : स्फुरद : पालाश : गंधक) या प्रमाणात खताचा वापर करावा.
  • कडधान्यासाठी १:२:१:१ (नत्र : स्फुरद : पालाश : गंधक) या प्रमाणात खताचा वापर करावा.
  •  पीक अवशेष आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
  •  सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फवारणीद्वारे करावा. सेंद्रिय खतांचा नियमित वापर करून जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा.
  • विविध जिवाणू खतांचा वापर करावा. (रायझोबियम, पीएसबी, ॲझोटोबॅक्टर इ.)
  • समस्यायुक्त क्षारयुक्त व चोपण जमिनीत भूसुधारकांचा (जिप्सम, सेंद्रिय खते, पेंडीचे खते, प्रेसमड, ऊस मळी) वापर करावा.
  • चुनखडी विरहित जमिनीमध्ये जिप्समचा वापर करावा.
  •  मृद्‌ व जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.
  • जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे 

  • सामू सहापेक्षा कमी किंवा आठपेक्षा जास्त आहे.
  • चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असणे.
  • जमिनीची जलधारण क्षमता कमी असणे.
  • जमिनीत सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण असणे.
  • वरखताच्या मात्रेतून दिलेल्या अन्नद्रव्यांचे जमिनीत स्थिरीकरण
  • होणे.
  • जमीन पाणथळ किंवा उथळ किंवा फार खोल असणे.
  • सतत पीक घेण्याने सतत अन्नद्रव्यांचा उपसा होतो.
  • पिकांची फेरपालट न करणे. द्विदल पिकांचा समावेश नसणे.
  • खाऱ्या पाण्याचा सतत वापर करणे. भरखते अजिबात न वापरणे.
  • एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन 

  • पिकांसाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करावे.
  • रासायनिक वरखते, सेंद्रिय भरखते, पिकांचे वाया जाणारे अवशेष, पिकांची फेरपालट, आंतरपिके व त्यात द्विदल पिकांचा समावेश करावा.
  • हिरवळीची पिके, जैविक खतांचा वापर, नत्र स्थिरीकरण, स्फुरद विद्राव्य करणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर महत्त्वाचा आहे.
  • संपर्क ः डॉ. हरिहर कौसडीकर, ९४२३१४२२१० (संचालक (शिक्षण), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT