Downy mildew and powdery mildew infestation
Downy mildew and powdery mildew infestation 
कृषी सल्ला

कृषी सल्ला (हरभरा, गहू, भुईमूग, भेंडी, कांदा, वेलवर्गीय भाजीपाला)

ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

साठविलेल्या धान्यात लिंबाचा पाला मिसळावा (१ क्विंटलसाठी २ किलो लिंबाचा पाला वापरावा). साठविलेल्या धान्यातील किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने त्यातील ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील, अशी काळजी घ्यावी.

हरभरा, गहू

  • साठविलेल्या धान्यात लिंबाचा पाला मिसळावा (१ क्विंटलसाठी २ किलो लिंबाचा पाला वापरावा). 
  • साठविलेल्या धान्यातील किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने त्यातील ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील, अशी काळजी घ्यावी.
  • भुईमूग

  • आऱ्या लागणे.
  • ४५ व ५५ दिवसांनी २०० लिटर पाण्याचा मोकळा ड्रम पिकावरून दोनदा फिरवावा. यामुळे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात. त्यांना शेंगा लागतात.
  • पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी) 
  • क्विनॉलफॉस २ मिलि किंवा क्लोरपायरिफॉस २ मि.लि.
  • भेंडी

  • फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी)
  • इमामेक्टीन बेन्झोएट (५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम.
  • पांढरी माशी व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीकडून पाने खरवडली जात असल्याने बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या दोन्हींच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी)
  • थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूडीजी) ०.४ ग्रॅम अधिक मेटॅलॅक्झिल एम.अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम. 
  • कांदा

  • सध्याच्या ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे कांदा पिकावर फुलकिडींचा व करपा रोगाचा प्रादुभाव दिसून येईल. प्रादुर्भाव आढळल्यास, नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी 
  • डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मि.लि. अधिक  कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि.
  • यासोबत स्टिकर १ मि.लि. प्रमाणे मिसळावे. 
  • पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार घ्यावी.
  • गवार

  • भुरी (पावडरी मिल्ड्यू) रोगाची लक्षणे दिसताच, फवारणी प्रति लिटर पाणी 
  • हेक्झाकोनॅझोल १ मि.लि.
  • वेलवर्गीय भाजीपाला (कारली, घोसाळी, दोडका, दुधी भोपळा काकडी)

  • फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, एकरी ५ क्लू-ल्युरचे सापळे वापरावेत. 
  • केवडा (डाऊनी मिल्ड्यू) रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत. प्रतिबंधक उपाय म्हणून बियाण्यांची उगवण झाल्यानंतर २० दिवसांनी पहिली फवारणी घ्यावी (प्रतिलिटरपाणी)
  • क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम.
  • रोगाची तीव्रता वाढल्यास, (फवारणी प्रति लिटर पाणी)
  • मेटॅलॅक्झिल एम. अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम.
  • भुरी (पावडरी मिल्ड्यू) रोगाची लक्षणे दिसताच, (फवारणी प्रति लिटर पाणी)
  • पॅनकोनॅझोल १ मिलि पाण्यात मिसळून साध्या हातपंपाने आवश्यकतेनुसार फवारण्या कराव्यात.
  • आवश्यकता भासल्यास बुरशीनाशक बदलून पुढील फवारणी करावी.  
  • - ०२४२६-२४३२३९ (प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

    Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

    Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

    Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

    Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

    SCROLL FOR NEXT