Custerd Apple Processing Agrowon
कृषी प्रक्रिया

Custerd Apple Processing : सीताफळ गरापासून जॅम कसा बनवायचा?

सीताफळापासून रबडी, गर पावडर, मील्क शेक असे पदार्थ तयार होतात. याशिवाय सीताफळापासून जॅमही बनवता येतो.

Team Agrowon

सीताफळ जास्त प्रमाणात उपलब्ध असतील किंवा विक्री अभावी वाया जाणार असतील किंवा खूप कमी भाव मिळत असेल तेव्हा प्रक्रिया करून सीताफळाचे मूल्यवर्धन (Custerd Apple Processing) होते.  पूर्ण पिकलेले सीताफळ एक अथवा दोन दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. म्हणून सीताफळावर प्रक्रिया करून त्याचा गर काढून साठवून ठेवला तर तो वर्षभर वापरता येतो. यामुळे एक ते दोन महिना कालावधी असलेल्या या फळाचा आस्वाद पूर्ण वर्षभर हवा तेव्हा घेता येतो.  सीताफळापासून रबडी, गर पावडर, मील्क शेक असे पदार्थ तयार होतात. याशिवाय सीताफळापासून जॅमही बनवता येतो.

- जॅम बनवण्यासाठी सीताफळाच्या १ किलो गरामध्ये ७०० ते ७५० ग्रॅम साखर आणि ८ ते १० ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून पूर्णपणे विरघळवून घ्यावे. ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे. 

- मिश्रण गरम करताना सतत ढवळत राहावे. ते मिश्रण घट्ट होईपर्यंत म्हणजेच तुकड्यात पडेपर्यंत शिजवावे. या वेळी त्या मिश्रणाचा टीएसएस ६८ ते ६९ टक्के असतो.

- तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यामध्ये भरून, बाटल्या थंड करून, त्यावर मेणाचा थर द्यावा किंवा ॲल्युमिनिअम फॉइल लावून, झाकणे लावून, लेबल करावे. थंड आणि कोरड्या जागी साठवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT