Custard Apple Processing Agrowon
कृषी प्रक्रिया

Custard Apple Processing : सीताफळ गर कसा टिकवाल?

स्वस्त प्रमाणात फळे उपलब्ध असतील किंवा विक्री अभावी वाया जाणार असतील किंवा खूप कमी भाव मिळत असेल तेव्हा प्रक्रिया सीताफळाचे मूल्यवर्धन करता येते.

Team Agrowon

सीताफळामध्ये (Custard Apple) पाण्याचे अधिक प्रमाण असल्यामुळे हे फळ नाशवंत फळामध्ये येते. जास्त प्रमाणात फळे उपलब्ध असतील किंवा विक्री अभावी वाया जाणार असतील किंवा खूप कमी भाव मिळत असेल तेव्हा प्रक्रिया करून सीताफळाचे मूल्यवर्धन (Custard Apple Value Addition) करता येते. सीताफळावर प्रक्रिया करून चांगला लघुउद्योग सुरू करून ग्रामीण भागातील महिला चांगला फायदा मिळवू शकतात.

सीताफळ गराचा उपयोग

सीताफळ गर वापरून मिल्क शेक, ज्यूस, बासुंदी, रबडी, आईस्क्रीम असे पदार्थ तयार करता येतात. तसेच गराला वाळवून सीताफळ पावडर; कस्टर्ड पावडर देखील तयार करता येतो. ज्याचा उपयोग फ्रूट कस्टर्ड, आइस्क्रीम आणि अनेक गोड पदार्थांमध्ये केला जातो. या पदार्थांमुळे बाजारामध्ये सीताफळ गराला सध्या चांगली मागणी आहे. सीताफळाच्या किमतीपेक्षा चार ते पाच पट जास्त उत्पादन मिळू शकते.

सीताफळ गर

पिकलेली आणि जास्त पाकळी युक्त सीताफळे निवडावीत.

सीताफळाचे दोन भाग करून आतील गर बियासहीत चमच्याने काढून घ्यावा. तसेच सीताफळ गर काढण्याच्या मशिनद्वारे ही गर आणि बिया वेगळ्या करता येतात.

काढलेल्या एक किलो गरामध्ये एक ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाईड हा संरक्षक पदार्थ टाकून पॅकिंग करावी.

हा गर २० अंश सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावा.

चांगल्या दर्जाच्या फळापासून ३० ते ३५ ग्रॅम गर मिळतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT