Jam, jelly, squash from pomegranate
Jam, jelly, squash from pomegranate 
कृषी प्रक्रिया

डाळिंबापासून जॅम, जेली, स्क्वॅश ​

डॉ. मन्मथ सोनटक्के, गणेश राऊत

डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप तयार करता येते. त्याच्या नैसर्गिक रंगामध्ये फक्त स्वाद मिसळला असता हे पेय अनैसर्गिक सिरपला पर्याय ठरू शकते.​ जॅम  

  • जॅम बनवण्यासाठी डाळिंबाच्या १ किलो गरात १ किलो साखर, ४ ग्रॅम सायट्रिक आम्ल (लिंबू भुकटी), ४ ग्रॅम पेक्टीन मिसळावे लागते. नंतर हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवावे. 
  • शिजविताना ते स्टीलच्या पळीने सतत ढवळत राहावे. म्हणजे गर बुडाला लागत नाही. जॅम चांगल्या प्रतीचा तयार होतो. त्यामध्ये साखर मिसळून ६८ ते ७० डिग्री ब्रिक्स एवढे विद्राव्य घन पदार्थ तयार झाल्यावर जॅम तयार होतो.
  • तयार झालेला जॅम कोरड्या व निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बाटलीत भरावा. जॅमचा वापर ब्रेड किंवा चपाती सोबत  करता येतो. 
  • जेली 

  • जेली तयार करण्याकरिता डाळिंबाचे दाणे काढून त्याचा रस काढावा. रसाची पेक्टीनसाठी परीक्षण करून चांगली जेली तयार करता येते. 
  • काढलेला रस पातळ कपड्यामधून गाळून घ्यावा.  ५० टक्के फळाचा रस पाण्यात एकजीव करून १५ ते २० मिनिटे गरम करावा. गाळलेल्या रसात समप्रमाणात साखर,  ०.७ टक्के  सायट्रीक आम्ल आणि पेक्टीन मिसळून उकळी येईपर्यंत शिजवावे. या वेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे ११० अंश सेल्सिअस एवढे ठेवावे. 
  • तयार जेलीमध्ये एकूण घन पदार्थाचे प्रमाण ७० डिग्री ब्रिक्स इतके असते. जेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी. 
  •  स्क्वॅश

  • डाळिंबाचा रस काढून तो पातळ मलमल कापडातून गाळून घ्यावा. हा रस स्क्वॅश तयार करण्यासाठी वापरावा. 
  • डाळिंब रसात १३ टक्‍के ब्रिक्स व ०.८ टक्‍के आम्लता गृहीत घरून स्क्वॅश तयार करण्यासाठी २५ टक्‍के डाळिंबाचा रस,  ४५ टक्‍के साखर व २ टक्‍के सायट्रिक आम्ल या सूत्रानुसार घटक पदार्थाचे प्रमाण  वापरावेत. 
  • पातेल्यात १.५० लिटर पाणी घ्यावे. त्यामध्ये ३० ग्रॅम  सायट्रिक आम्ल व १.३० किलो साखर पूर्ण विरघळून घ्यावी. हे द्रावण पातळ मलमल कापडातून दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यावे. त्यात डाळिंबाचा रस टाकून चमच्याने एकजीव करावा. हे द्रावण मंद आचेवर गरम करून घ्यावे. नंतर एका ग्लासमध्ये थोडा स्क्वॅश घेऊन एका ग्लासमध्ये ३ ग्रॅम  सोडियम बेन्झाईट ते चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. 
  • विरघळलेले पदार्थ स्क्वॅशमध्ये मिसळून ते चमच्याने एकजीव करावेत. निर्जंतुकीकरण करून घेतलेल्या बाटल्यांमध्ये हा स्क्वॅश भरून त्यांना ताबडतोब झाकणे बसवून हवा बंद करून स्क्वॅशच्या बाटल्या थंड व कोरड्या हवामानात ठेवून त्यांची साठवण करावी. हा स्क्वॅश वापरताना एकास तीन भाग पाणी घेऊन चांगले हलवून एकजीव करावा व  नंतर तो पिण्यासाठी वापरावा.
  • सिरप डाळिंबापासून इतर फळाप्रमाणेच उत्तम प्रकारचे सिरप तयार करता येते. त्याच्या नैसर्गिक रंगामध्ये फक्त स्वाद मिसळला असता हे पेय अनैसर्गिक सिरपला पर्याय ठरू शकते. संपर्क- डॉ. मन्मथ सोनटक्के, ९५११२९४०७४ (एम. जी. एम. अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,  गांधेली, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

    Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

    Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

    Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

    SCROLL FOR NEXT