watermelon juice and syrup 
कृषी प्रक्रिया

कलिंगडापासून तयार करा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने आरोग्यासाठी फायदे होतात. कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. कलिंगडापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतात.

गणेश गायकवाड, सुग्रीव शिंदे, ऋषिकेश माने

कलिंगड फळ खाण्याने किंवा ताजा रस पिल्याने आरोग्यासाठी फायदे होतात. कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. कलिंगडापासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविता येतात. कलिंगडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ रस कलिंगडाचे तुकडे करून त्यापासून रस काढावा. कलिंगडाची हिरवी साल आणि आतील गराचे पातळ तुकडे ज्युसरमध्ये घालून त्याचाही रस काढावा. यामुळे कलिंगड रसाची गोडी थोडीशी कमी होते, मात्र कलिंगडाच्या सालीमध्ये व पांढऱ्या गरामध्येही आरोग्यासाठी उपयुक्त घटक असतात. सिरप  कलिंगडाचे बारीक तुकडे करून फूड प्रोसेसरद्वारे रस काढावा. हा रस मोठ्या व जाड तळ असलेल्या भांड्यामध्ये मध्यम आचेवर तापत ठेवावा. भांड्यातील रस ढवळत रहावे. खालील बाजूस करपणार नाही याची काळजी घ्यावी. रस आवश्यकतेइतका घट्ट झाल्यानंतर चाळणीतून गाळून घ्यावा. यापासून मऊ लाल कलिंगड पाक आणि घट्ट कलिंगड गर अशी दोन उत्पादने तयार करता येतात. घट्ट कलिंगड गराला कलिंगड लोणी असेही म्हणतात. याचा वापर ब्रेडवर लावून खाण्यासाठी होतो. शीतपेय कलिंगडाच्या बारीक कापलेल्या फोडी, साखर, व्हॅनिला रस आणि मीठ फूड प्रोसेसर किंवा ब्लेंडरमधून बारीक करून घ्यावे. मिश्रण काही वेळ ढवळल्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये थंड करावे. वापरावेळी या रसामध्ये आवश्यक तितक्या तीव्रतेपर्यंत क्लबसोडा किंवा सेल्टझर मिसळावे. माऊसी कलिंगडाच्या गराचे तुकडे फूड प्रोसेसरमध्ये टाकून प्युरी तयार करून घ्यावी. एका भांड्यामध्ये दोन कप प्युरी घ्यावी. पाव कप वेगळ्या भांड्यामध्ये ठेवावी. भांड्यातील दोन कप प्युरीला मध्यम आचेवर उकळी द्यावी. दुसऱ्या भांड्यातील पाव कप प्युरीमध्ये जिलेटीन चांगले मिसळून घ्यावे. उकळी आलेल्या द्रावणामध्ये जिलेटीन मिसळलेली प्युरी चांगली मिसळून घ्यावी. त्यातील जिलेटिनला गाठी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा कप साखर मिसळावी. चांगले मिसळल्यानंतर मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड मिश्रणावर मलई पसरवावी. तयार कलिंगड माऊसीचे छोट्या वाट्यामध्ये लहान भाग करून फ्रिजमध्ये सेट होण्यास ठेवून द्यावे. यासाठी साधारणपणे दोन तास किंवा अधिक वेळ लागतो. कलिंगड सालींची भाजी कलिंगड सालीला काकडीप्रमाणे एक कुरकुरीतपणा असतो. उष्णता दिल्यानंतरही तो टिकून राहतो. त्यामुळे तो शिजल्यानंतरही उत्तम चव येते. सालीमध्ये विविध मसाले चांगल्या प्रकारे मुरतात. भाजी करण्यापूर्वी जाड हिरव्या साली काढून टाकाव्यात. आरोग्यासाठी फायदे

  • कलिंगडातील लायकोपेन आरोग्यासाठी उपयुक्त असते. विशेषतः मुक्तकणांमुळे हृदयाला होणाऱ्या हानीपासून वाचवण्यासाठी मदत करते. लायकोपेनयुक्त आहारामुळे अतिनील किरणांपासून त्वचेला इजा पोचत नाही. सूर्यप्रकाशामध्ये सातत्याने काम करण्यामुळे येऊ शकणाऱ्या सुरकुत्या आणि त्वचेच्या कर्करोगालाही ते दूर ठेवते.
  • कलिंगडामध्ये सिट्रलीन हे अमिनो आम्ल मुबलक प्रमाणात असते. सिट्रलीन रक्तवाहिन्यांवरील आणि अतिकष्टामुळे स्नायूंमध्ये आलेला ताण कमी करते. तसेच हृदयविकार दूर ठेवण्यास मदत करते.
  • व्यायामापूर्वी कलिंगडाच्या रसाचे सेवन केल्यास दाह कमी करते. त्यातील फ्लॅव्हेनॉइड, कॅरोटीनॉइड यासारखे घटक दाह निर्माण करणाऱ्या ट्रीटेरपेनॉइड घटकांशी लढतात.
  • कलिंगडामध्ये अधिक प्रमाणात क जीवनसत्त्व आणि अल्प प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यामध्ये असलेल्या बीटा कॅरोटीन चे शरीरामध्ये अ जीवनसत्त्वात रूपांतर केले जाते. यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम ही खनिजे असतात. कलिंगडाच्या बियांमध्ये लोह आणि जस्ताची पातळी अधिक असते.
  • कलिंगड रस मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतो. याच्या बियाही मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त असतात.
  • कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरील तजेलपणा वाढण्यास मदत होते. उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असल्यास कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी.
  • संपर्क - गणेश गायकवाड,९८५०२३६३८० (पीएच. डी. स्कॉलर, अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Monsoon Update: घाटमाथा, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात पावसाचा अंदाज

    Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

    Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

    Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

    Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

    SCROLL FOR NEXT