कुळीथ 
कडधान्ये

कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः कुळीथ

एस. एन चौधरी

प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे तसे मूग, मसूर, चवळी, राजमा या ठराविक धान्यांना आपण कडधान्य म्हणतो आणि त्यांचाच समावेश सातत्याने आहारात केला जातो. कुळीथ, हे एक कडधान्य असून यामध्ये औषधी गुणधर्मदेखील आहेत. कुळीथाला विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे तामिळमध्ये कोल्लू, मल्याळम मध्ये मुधीरा, गुजराती आणि मराठीमध्ये कुळीथ. खरीप अाणि रब्बी अशा दोन्ही हंगामांत हे पीक घेता येते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, बिहार, राजस्थान, झारखंड या राज्यांमध्ये प्रामुख्याने कुळीथाचे उत्पन्न घेतले जाते. कुळीथामध्ये ५७.२ टक्के कर्बोदके, २२ टक्के प्रथिने आणि अत्यंत कमी म्हणजे ०.५ टक्के स्निग्ध पदार्थ आहेत. ३२१ किलो कॅलरी ऊर्जा मिळते. त्या शिवाय ३.२ टक्के खनिजे आणि ५.३ टक्के तंतुमय पदार्थ असतात. चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर

  • पचनक्रिया सुलभ होते.
  • स्थूलपणा कमी होतो.
  • रक्तातील साखर नियंत्रित राहून मधुमेहासारख्या आजारासाठी उत्तम आहार आहे.
  • मोड आलेले कुळीथ खाल्याने व्हिटॅमिन सी, थायमिन, पोटॅशिअम, लोह मुबलक प्रमाणात मिळतात.
  • कुळीथ बद्धकोष्ठतेसाठी उपयोगी सिद्ध झाल्याचे संदर्भ आढळतात.
  • औषधी गुणधर्म

  • अनियमित मासिक पाळी असणाऱ्यांना कुळीथ किंवा मोड आलेले कुळीथ खाणे फायद्याचे आहे.
  • कुळीथ भिजवलेले पाणी नियमित सेवन केल्याने किडनी स्टोन पासून लाभ मिळतो.
  • त्वचा विकारांवर सुद्धा थोड्या पाण्या सोबत कुळीथ पावडर खाणे फायद्याचे आहे, इत्यादी.
  • टी. बी., तांबड्या रक्तपेशींची बेसुमार वाढ झालेल्या अवस्थेत आणि गर्भवती महिलांनी कुळीथ खाऊ नये.
  • प्रक्रियेतील महत्व

  • कुळीथापासून वेगवेगळे पदार्थ बनवून आहारात समाविष्ट करता येतात. कुळीथापासून शेंगोळे हा पारंपरिक पदार्थ बनवता येतो.
  • कुळीथाचे पीठ विविध प्रकारच्या बेकरी पदार्थात समाविष्ट करून कुळीथ खाण्यायोग्य करता येते.
  • मोड आलेल्या कुळीथाचे सॅलड, सूप, सुद्धा लहानांपासून थोरांना नक्की आवडेल.
  • संपर्क ः एस. एन चौधरी, ८८०६७६६७८३ (के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेत अनेक त्रुटी कायम

    Dragon Fruit: ड्रॅगन फ्रूटच्या दरात सुधारणा

    October Weather: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका ठरतोय तापदायक

    CCI Cotton Procurement: ३.२५ लाख शेतकऱ्यांची कपास किसान अॅपवर नोंदणी; १५ ऑक्टोबर पासून कापसाची हमीभावावर खरेदी सुरु होणार

    Peek Pahani: ई-पीक पाहणी केली नसेल तर एक आहे पर्याय, जाणून घ्या सहाय्यक स्तरावरील पीक पाहणीविषयी...

    SCROLL FOR NEXT