gochid marnyasathi upay Agrowon
Image Story

गोचीड नष्ट करण्याचे जैविक उपाय

जगभरामध्ये गोचीडाचा प्रादुर्भाव जवळ-जवळ सर्वच जनावरांमध्ये आढळून येतो. एका सर्व्हेनुसार जगभरातील जवळपास ८० टक्के जनावरामध्ये गोचिडांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

Roshani Gole

एकून गोचीडांपैकी जनावरांच्या अंगावर फक्त १० ते १५ टक्के गोचीड असतात. उरलेले ८० ते ९० टक्के गोचीड हे आजूबाजूच्या परिसरात, गोठ्यामध्ये विशेषतः खाच खळग्यात, लाकडाच्या फटीमध्ये, भिंतींच्या भेगांमध्ये, गव्हाणीमध्ये लपून बसतात.

गोचीड निर्मुलनासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु एकाच औषधाचा सातत्याने वापर केल्यास गोचीडांना त्या औषधाची सवय होऊन जाते. परिणामी औषधाचा परिणाम कमी झालेला दिसून येतो. असे होऊ नये म्हणून दर दोन ते तीन महिन्यांनी औषधे बदलावी लागतात.

जनावरांच्या अंगावर मारायच्या औषधाची तीव्रता नेहमी परिसरात फवारायच्या औषधापेक्षा कमी असावी. फवारणी करताना औषध जनावरांच्या नाका-तोंडात जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.

जैविक पद्धतीने उपचार करताना एक लिटर पाण्यात ४० मिली करंज तेल, ४० मिली नीम तेल आणि ४० ग्रॅम साबण मिसळून द्रावण तयार करावे. तयार केलेले द्रावण वासरांच्या अंगावर ३ ते ४ दिवसाच्या अंतराने लावावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव विचाराधीन नाही; अर्थमंत्र्यांनी दिली माहिती

Irrigation Water Management: समृद्धीकडे नेणारा सिंचन नियोजनाचा आराखडा

Livestock Care: उन्हाळ्यातील जनावरांचे आहार व्यवस्थापन

Ethanol Fuel: इथेनॉल; इंधन स्वयंपाकाचे!

Climate Change: कुणालाच नाही उद्याची चिंता

SCROLL FOR NEXT