Village Development Agrowon
ग्रामविकास

Village Development : ग्रामविकासासाठी महत्त्वाच्या नोंदी

Team Agrowon

Importance Record for Village Development :

महसूल विभागाकडील जलस्रोतांचा तपशील गाव नमुना क्रमांक १४

या नमुन्यात गावातील पाणी पुरवठ्याच्या साधनांविषयी नोंदी ठेवल्या जातात. सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिलपर्यंत या नोंदी अद्ययावत करण्यात येतात. गावात असणाऱ्या लोकांना आणि जनावरांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या साधनांचा आणि सिंचनासंबंधी आकडेवारीची नोंद असते. दरवर्षी यात वाढ अथवा घट याची नोंद करण्यात येते. ही नोंद महसूल विभागामार्फत ठेवण्यात येते.

नोंदीचा तपशील

यामध्ये पाणीपुरवठ्याच्या साधनांचा तपशील जसे, की नदी, ओढा, विहीर, तलाव इत्यादींची नोंद असते. त्याच प्रमाणे त्याचे ठिकाण, पत्ता आणि स्थान याची देखील नोंद असते.

पाणीपुरवठ्याचे साधन पक्के आहे किंवा कच्चे आहे याचीही नोंद घेतली जाते. या साधनांचा कोणत्या कारणासाठी वापर करण्यात येतो त्याचाही उल्लेख असतो. (माणसे आणि जनावरांना पिण्यासाठी, जनावरे धुणे, जलसिंचन इत्यादी), याची मालकी कोणाची याचीही नोंद असते. उदाहरणार्थ शासकीय किंवा खासगी.

गाव नमुना १२

यामध्ये पीक पाहणी आणि पैसेवारीची नोंद असते. त्याच प्रमाणे यामध्ये पिके आणि जलसिंचनाच्या साधनांची सविस्तर माहिती असते. (संदर्भ : महाराष्ट्र जमीन महसूल अभिलेख आणि नोंद वह्या तयार करणे आणि सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१)

महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ अन्वये ग्रामपंचायत स्तरावर देखील या नोंदी असतात. थोडक्यात, गावस्तरावर वरीलप्रमाणे जलस्रोतांची सविस्तर माहिती, त्याच प्रमाणे माणसांना आणि जनावरांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यक माहिती,

त्याचप्रमाणे एकूण जमीन आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची नोंद आणि गावात संपूर्ण वर्षात पडलेल्या पावसाची नोंद असते, दुष्काळाच्या आगमनाची आणि त्याच्या तीव्रतेची जाणीव करून देणारी माहिती असते.

दुष्काळाचे संनियंत्रण आणि देखरेख

दुष्काळ ही गंभीर आपत्तीच असते त्यासाठी त्यांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हा स्तरावर समित्या गठित केल्या आहेत.

राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समिती

राज्यातील दुष्काळावर आणि परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यातून प्रपात शास्त्रीय निर्देशकाचे मूल्यांकन विचारात घेऊन राज्य शासनास दुष्काळा संदर्भात सल्ला देण्यासाठी; आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षते खाली समिती गठित करण्यात आलेली आहे.

समितीमधील सदस्य

१) आयुक्त (कृषी) २) आयुक्त (पशुसंवर्धन) ३) आयुक्त (भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा) ४) मुख्य अभियंता, जलविज्ञान प्रकल्प, नाशिक ५) संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र ६) समितीस आवश्यक वाटतील असे आवश्यक निमंत्रित सदस्य. ७) संचालक कृषी, महाराष्ट्र राज्य ः सदस्य सचिव.

जिल्हा स्तरीय समिती

१) जिल्हाधिकारी : अध्यक्ष

२) मुख्य कार्यकारी अधिकारी

३) जलसंपदा विभागाचे जिल्हा स्तरीय प्रमुख

४) वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा

५) संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र नागपूर. तसेच या संस्थेतील तज्ज्ञ आवश्यकतेनुसार

६) निवासी उपजिल्हाधिकारी

७) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी : सदस्य सचिव

८) समितीला आवश्यक वाटतील असे अधिकारी : निमंत्रित सदस्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT