Solapur ZP News : योग्य नियोजन आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास वेगाने आणि परिणामकारकरीत्या होईल, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शनिवारी चिंचणी (ता. पंढरपूर) येथे बोलताना केले.
सोलापूर सोशल फाउंडेशन आणि चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी समृद्ध गाव अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी स्वामी बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष देशमुख होते.
श्री. स्वामी म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या तीन मध्ये निर्मलग्राम असलेल्या चिंचणीने कचरा मुक्त ग्राम अभियानात देखील चांगले पाऊल टाकले आहे. कृषी पर्यटनाचे ठिकाणी स्वच्छता असेल तर सोन्याहून पिवळे आहे. सध्या मासिक पाळी सप्ताह आहे.
या कालावधीत मासिक पाळी बाबतचे समज व गैरसमजाबाबत ग्रामीण भागात अधिक प्रबोधन करण्याची गरज आहे. महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्या, जैविक कचरा बरोबर, वैद्यकीय कचराकडे देखील गांभीर्याने पाहा, कोरोनामुक्त असलेले चिंचणी गावात मोहन अनपट सारख्या तरुण युवकांनी चेहरामोहरा बदलला आहे.
गावचा शाश्वत विकास करायचा असेल, तर पुढच्या पिढीचा विचार करून शाळांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे सांगितले. बालविवाहांच्या बाबतीत सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात आघाडीवर आहे ही अतिशय कटू वस्तुस्थिती आहे असे सांगताना त्यांनी या जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त असल्याचे विशद केले.
प्रभारी जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी, ग्रामीण भागातल्या पर्यावरण प्रेमी उत्पादनांना शहरांमध्ये चांगली मागणी असल्याचे सांगितले. कार्यशाळेत पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सांगोल्याचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे, कृषिभूषण अंकुश पडवळे, रफिक नदाफ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी उपस्थित होते.
‘...तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल’
सुभाष देशमुख म्हणाले, ‘‘सरपंच हाच गावाच्या विकासाचा खरा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे सरपंचांनी निर्धार केला, तर गावात झपाट्याने परिवर्तन होईल.
त्यामुळेच या सरपंचांचे प्रबोधन व्हावे. नवकल्पना राबवाव्यात, यासाठी ही कार्यशाळा आयोजिली. सरपंच-उपसरपंचांनी आपल्यातील ताकद, शक्ती ओळखून काम केल्यास नक्कीच परिवर्तन होईल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.