स्वच्छतेच्या कामांसह ट्रॅक्टर खरेदी व यांत्रिकीकरणातही गावकऱ्यांनी आघाडी घेतली आहे.
स्वच्छतेच्या कामांसह ट्रॅक्टर खरेदी व यांत्रिकीकरणातही गावकऱ्यांनी आघाडी घेतली आहे.  
ग्रामविकास

जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा, रावळगुंडवडी झाले ट्रॅक्टर्सचे गाव 

Abhijeet Dake

रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील ग्रामस्थांनी एकी जपत विकासाची कामे केली. कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत अनुदान घेऊन १८ ट्रॅक्टर्स खरेदी केले. यामुळे ट्रॅक्टर्सचे गाव म्हणून त्याची ओळख होऊ लागली आहे. गावातील नागरिकांनी स्वच्छतेचाही वसा घेतला असून प्रत्येक घर, गल्ली व पंचक्रोशी ‘स्वच्छ व स्मार्ट’ ठेवण्यासाठी ग्रामस्थ मोलाचा वाटा उचलत आहेत.   सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यात कनार्टक सीमेलगत रावळगुंडवडी हे गाव आहे. सुमारे ४५२ कुटुंबांच्या या गावाची लोकसंख्या सुमारे २५०६ आहे. कायम दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करीत त्यातून पुढे येण्यासाठी गाव लढते आहे. सध्या गावाला पाण्याची टंचाई भासते आहे. यामुळे ग्रामपंचायतीने सत्याप्पा हिरगोंड याची कूपनलिका अधिग्रहण केली आहे. कूपनलिकेपासून पाच हजार ४०० फूट पाइपलाइनद्वारे गावच्या विहिरीत पाणी सोडले आहे. सद्यस्थितीत पाणीटंचाई मिटली असली तरी पुढील काळात टॅंकरची आवश्यकता भासणार आहे.  जनतेची साथ, निवडणूक बिनविरोध  गाव समृद्ध करायचे तर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याबरोबरच जनतेची साथ असणे गरजेचे असते. रावळगुंडवडी गावाने त्यातूनच २००७ पासून ग्रामस्वच्छतेचा ध्यास मनी बाळगला. ग्रामपंचायतीची स्थापना १९६६ मध्ये झाली. त्यानंतर आजअखेर निवडणूक झालेली नाही. सरपंच, सदस्यांची निवड ग्रामस्थच करतात. यात कुणाचेही मतभेद होत नाहीत. घेतले जाणारे निर्णय सर्वानुमते मान्य केले जातात. यामुळेच गाव "स्वच्छतेकडून समृद्धीकडे' पोचले आहे. स्वच्छता अभियानात तरुणांसह ज्येष्ठ लोकांनी पुढाकार घेतला आहे. गाव केवळ स्वच्छतेचा वसा हाती घेऊन थांबले नाही, तर शेती हा विषयदेखील गावविकासाच्या अजेंड्यावर आहे.  शेती आणि यांत्रिकीकरण  शेतीत मजुरांची समस्या भेडसावते आहे. साहजिकच शेतकरी यांत्रिकीकरणाचा पर्याय वापरू लागला आहे. रावळगुंडवाडीच्या शेतकऱ्यांना यात कृषी विभागाची साथ मिळते आहे. विविध कृषी योजनांचा लाभ तो घेतो आहे. ट्रॅक्टर घेऊन मजूर समस्येवर मात करताना दिसतो आहे. पंचक्रोशीतील शेतीची कामेही भाडेतत्त्वावरील रूपाने मिळू लागल्याने आर्थिक हातभार लागला आहे.  गावाने कृषी विभागाच्या हाती घेतलेल्या योजना 

  • उन्नत शेती समृद्ध शेतकरी. 
  • राष्ट्रीय फलोत्पादन अभियान. 
  • माती-पाणी परीक्षण ३०० शेतकऱ्यांनी केले. 
  • पॅकहाउस- ९ शेतकऱ्यांनी घेतला लाभ. 
  • शेततळी- ७०. 
  • गावाचे भौगोलिक क्षेत्र - १७८३.९३ हेक्टर 

  •  द्राक्ष - ९ हेक्टर 
  •  डाळिंब- ३६ हेक्टर 
  •  भाजीपाला ६ हेक्टर 
  •  रब्बी हंगाम- ११०० हेक्टर- री, हरभरा, मका 
  • खरीप हंगाम - ९०० हेक्टर- उडीद, तूर, हरभरा 
  •  दोन्ही वेळचे दूध संकलन- २५०० लिटर 
  • मिळालेले पुरस्कार 

  • सन २००७-०८- महात्मा गांधी तंटामुक्त अभियान. 
  • सन २००७-०८- संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान जिल्हा पातळीवर दुसरा क्रमांक. पुणे विभागात प्रथम. 
  • सन २०१०-११- जत पंचायत समिती- आदर्श सरपंच पुरस्कार. 
  • ग्रामविकासाची घडविलेली कामे 

  • लोकसहभागातून आठवड्यातून एकदा ग्रामस्वच्छता मोहीम 
  • सांडपाणी व्यवस्थापन 
  • श्रावणमासात प्रवचनातून स्वच्छतेचे संदेश 
  • तंटामुक्ती गाव 
  • वीस बचत गटांची स्थापन करून लघुउद्योगासाठी प्रेरणा 
  • मराठी आणि कन्नड शाळा. अंगणवाडी शिक्षणाचे फलक 
  • प्रत्येक प्रभात फेरीला स्वच्छता आणि वृक्षलागवडीविषयी जनजागृती 
  • कृषी विभागाच्या कोरडवाहू अभियानातून गावात २० ट्रॅक्‍टर्सचे वाटप 
  • शौचालये १०० टक्के 
  • ग्रामस्थांच्या मागण्या 

  • लोकप्रतिनिधींची हवी खंबीर साथ 
  • पाणी आणि चारा उपलब्ध करून द्यावा 
  • महिला बचत गटांना व्यवसाय उभारणीसाठी हवी मदत 
  • प्रस्तावित कामे 

  • नवीन ग्रामपंचायत कार्यालय 
  • वाचनालय 
  • मुख्यमंत्री पेयजल योजनेत गाव समाविष्ट करणे 
  • विविध भागांत ‘पेव्हिंग ब्लॉक्स’ बसविणे 
  • प्रतिक्रिया  केवळ गावाचा विकास झाला म्हणजे ग्रामस्थांचाही विकास झाला असे न मानता गावातील महिलांना एकत्र केले. त्यांचे बचत गट स्थापन केले. याद्वारे शिलाई, शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यास मदत केली. यामुळे महिला सबलीकरण होण्यास मदत मिळाली.  -अशोक हिरगोंडा, उपसरपंच  शेतीत यांत्रिकीकरण करणे गरजेचे वाटले. कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत  ट्रॅक्टर घेतला आहे. छोट्या अवजारांचा वापर वाढला. आता शेतीतील कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होत आहे.  -अशोक महादेव बस्तवाड  ट्रॅक्टरसाठी एक लाख रुपयांचे अनुदान घेतले. द्राक्ष, डाळिंब बागेत फवारणीसाठी त्याचा उपयोग होऊ लागला आहे. पंचक्रोशीतील कामेही त्याद्वारे मिळू लागल्याने आर्थिक फायदा होत आहे.  -परगोंडा सिदगोंडा हिरगोंडा  गावाच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली एकी आम्ही जपली आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जण विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलतो.  -सौ. संगीता इरगोंडा लोहगाव  सरपंच  संपर्क- ९९८७२१९२५७, ९२८४८२२७७१  गावातील सर्व निर्णय एकत्र बसून घेतले जातात. यामुळे कोणता तंटा उद्‍भवत नाही. गाव स्वच्छ करण्यासाठी लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभागी असतो. सर्वांचा विकास आणि समृद्धी त्यातूनत घडते.  -ए. के. कुंभार- ९४२१३३८१८७  ग्रामसेवक  कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ ग्रामस्थ घेतात. त्यामुळे शेतकरी प्रगती करू लागला आहे. गेल्या तीन वर्षात दोन कोटी रुपयांचे अनुदान गावातील शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. माती आणि पाणी परीक्षणही शेतकरी करून घेत आहेत. जमिनींची सुपीकता टिकवण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे.  -विजय भुजबळ  कृषी सहायक  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

    Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

    Cotton Market : कापूस का काळवंडला?

    Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

    Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

    SCROLL FOR NEXT