bunds were built with the help of youth for water conservation.
bunds were built with the help of youth for water conservation. 
ग्रामविकास

कृषी, पर्यावरण, आरोग्य प्रकल्पांतून नारायणगावची प्रगती

गणेश कोरे

वेगाने होणाऱ्या शहरीकरणातही कृषी, पर्यावरण, आरोग्य या विषयांवर लक्ष केंद्रित करुन गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न नारायणगावने (जि. पुणे) केला आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि लोकसहभाग यातून गावाने विविध उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या निवडक ग्रामपंचायतींमध्ये जुन्नर तालुक्यातील नारायणगांवचा समावेश होतो. पुणे- नाशिक महामार्गावरील नारायणगावचे झपाट्याने शहरीकरण होत असताना कृषी पर्यावरण आणि ग्रामविकासाचे शाश्‍वत मॉडेल सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली साकारत आहे. शेती, पर्यावरण, इतिहास आणि क्रिडा या क्षेत्रांची आवड असलेल्या पाटे यांनी पुढे ग्रामपंचायतीच्या कामात लक्ष देण्यास सुरुवात केली. वडील माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे यांचा वारसा घेऊन दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून व डिसेंबर २०१७ रोजी लोकनियुक्त सरपंच म्हणून गावाचे नेतृत्व ते करीत आहेत. गावातील उल्लेखनीय प्रकल्प ग्रामपंचायत व लोकसहभागातून अनेक उपक्रम गावाने सुरू केले आहेत. उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळण्यासाठी नारायणगावचे भूमिपुत्र व राज्याचे माजी कामगार मंत्री स्व.साबीरभाई शेख यांच्या नावाने ठिबक सिंचन अनुदान योजना सुरु केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यातून प्रत्येकी १० हजार रुपये अनुदान दिले जाते. दरवर्षी पाच लाख रुपये रक्कम अनुदानासाठी राखीव ठेवली जाते. सुदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय परसबाग रासायनिक शेतीचे प्रतिकूल परिणाम लक्षात घेता कृषी विज्ञान केंद्र, सेंद्रिय तज्ज्ञ यांच्यासोबत सेंद्रिय शेतीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. शेतकरी व महिलांना सेंद्रिय व आरोग्यवर्धक अन्ननिर्मिती व त्यासाठी परसबागेसंबंधी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या वाडी वस्त्यांवर परसबागांची निर्मिती केली आहे. वृक्षारोपण वाढत्या शहरीकरणामुळे शेतीतील जैवविविधता धोक्यात येऊ लागली आहे. त्यामुळे शेतीच्या बांधावर आणि शासकीय जमिनीवर वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला. यासाठी शेतकऱ्यांसाठी फळझाडे वाटपाचा उपक्रम हाती घेतला. गेल्या वर्षी सुमारे साडेसहाहजार फळझाडे व अन्य वृक्षांचे वाटप पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आले. ज्यांनी रोपे घेतली त्यांनी त्यांचे संगोपनही योग्य प्रकारे केले. संकल्पनेला भरीव यश आल्याने योजना अधिकाधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. जलस्रोत वाढीसाठी बंधारे पावसाची अनियमितता व घटलेली भूजल पातळी यामुळे भविष्यात पाण्याची टंचाई गावासह शेतीसाठी होऊ नये यासाठी पूर्व तयारी सुरु केली आहे. यासाठी सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन बंधारे बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठी ‘हेल्थ इज वेल्थ ग्रुप, ‘राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान’ यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने गणपीर बाबा टेकडी परिसरात बंधाऱ्यांचे काम करण्यात आले. याच परिसरात टेकडीवर समतल चर घेणे, वृक्षारोपण आदी कामेही मार्गी लावली. ओसाड टेकडी आता हरित दिसू लागली आहे. नदी स्वच्छता अभियान

  • नदीचे आरोग्य धोक्यात येऊ लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली. आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तर यशदा संस्था पुणे, सिम्बॉयसिस संस्था पुणे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांचे सहकार्य मिळाले.
  • त्यातून मीनाई नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यासाठी नारायणगाव, वारूळवाडी गावांमधील जागृत नागरिक व तज्ज्ञांची समिती स्थापन केली. अभियानासाठी बैठका, मार्गदर्शन शिबिरे सुरू केली. डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत गावातील महिला, विद्यार्थी, नागरिक व शिक्षकांनी काढलेली ‘जलदिंडी’ प्रेरणादायी उपक्रम ठरला. ‘माझा गाव माझा अभिमान’ ही जाणीव नागरिकांत रुजली.
  • जलप्रदूषण केले कमी दूषित पाण्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, रोगराई यांना अटकाव घालण्यासाठी याच अभियानांतर्गत यशदा संस्था, पुणे येथील तज्ज्ञ डॉ. सुमंत पांडे, डॉ.गुरुदास नूलकर, स्वाती दीक्षित, विना पाटील यांची मदत घेण्यात आली. त्याद्वारे लाभदायक सूक्ष्मजीव असलेल्या सेंद्रिय- जैविक घटकाची निर्मिती करण्यात आली. त्याचे मोफत वाटप ग्रामस्थांना करण्यात आले. कचरा कुंडी मुक्त गाव कचराकुंडी मुक्त गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. सकाळी व संध्याकाळी दोन वेळेस सुका आणि ओला कचरा संकलित करण्यासाठी नियोजितपणे सहा घंटागाड्यांची व्यवस्था सुरु केली. आजमितीला गावात एकही कचराकुंडी अस्तित्वात नसून गावातील सर्व कचऱ्याचे व्यवस्थित नियोजन केले जाते. गॅस शवदाहिनी असणारी ग्रामपंचायत पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सदस्या आशाताई बुचके आणि नारायणगाव ब्राह्मण संघाच्या माध्यमातून गॅस शवदाहिनी प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले. सुमारे ७५ लाख रुपयांचा हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. असे प्रकल्प राबवण्यासाठी अन्य गावांसाठी पथदर्शक ठरणार आहेत. पर्यावरण संरक्षक सन्मान गावाने कृषी, पर्यावरण, नदी स्वच्छता व आरोग्य मोहीम या विषयांत केलेल्या कामांची दखल घेण्यात आली. त्यातून डॉ.राजेंद्रसिंह राणा यांच्या राजस्थान येथील तरुण भारत संघ या संस्थेने महात्मा गांधी यांचे पुतणे अरुण गांधी यांच्या हस्ते सरपंच पाटे यांना यंदाच्या पर्यावरण संरक्षक सन्मानाने गौरविले आहे. अन्य उपक्रम

  • बावीस कोटी रुपयांची जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा योजना नुकतीच मंजूर
  • प्राथमिक शाळा व अंगणवाडी साठी ई-लर्निंग सुविधा
  • गावातील नऊ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा
  • सहा उद्यानांची लवकरच निर्मिती
  • संपर्क- योगेश उर्फ बाबू पाटे, ७०३८३४१८२८ नितीन नाईकडे- ९६७७०५५७७ (ग्रामविकास अधिकारी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

    Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

    Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

    Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

    Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

    SCROLL FOR NEXT