chana  Agrowon
इव्हेंट्स

Chana Bhav : शेतकऱ्यांनी हमीभावानेच हरभरा विकावा

सरकारने कडधान्याची (Cereals) आयात मोकळी केली. परिणामी देशात मोठी आयात झाली. त्यामुळे खरिपातील तूर, मूग आणि उडदाचे दर हमीभावापेक्षा कमी होते. बाजारातील दर आणि आयात पाहून रब्बी हंगामात शेतकरी कडधान्याची कमी लागवड करतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु हा अंदाज हरभऱ्याने चुकवला.

टीम ॲग्रोवन 

पुणेः सरकारने यंदा विक्रमी हरभरा (Chana) उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र जाणकारांच्या मते देशात ८५ ते ९५ लाख टनांच्या दरम्यानच उत्पादन (Production) होईल. सध्या आयात, नाफेडची विक्री आणि नवीन मालाची आवक, यामुळे बाजारात (Market) हरभरा दर ५ हजारांच्या आताच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडला (NAFED) हमीभावाने हरभरा विकावा. तसेच खुल्या बाजारात तीन महिन्यानंतर दर हमीभावाऐवढे राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राने यंदा हरभरा लागवडीत बाजी मारली. एकट्या महाराष्ट्रात लागवड ९ टक्क्यांनी वाढली. राज्यात २७ लाख हेक्टरवर हरभरा डोलतोय. केवळ क्षेत्रवाढच विचारात घेतली तर गुजरामध्ये सर्वाधिक ३४ टक्क्यांनी पेरा वाढला. येथे हरभरा क्षेत्र ८ लाख हेक्टरवरून थे ११ लाख हेक्टरवर पोचले. मध्य प्रदेशात २५ लाख हेक्टरवर लागवड झाली. मध्य प्रदेशातही पेरणी काहीशी वाढली. मात्र राजस्थान आणि कर्नाटकात यंदा हरभरा लागवड माघारली. राजस्थानमध्ये २० लाख हेक्टर आणि कर्नाटकात ११ लाख हेक्टरवर पीक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Market: स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ

Sugarcane Farming Technology: ‘एआय’ आधारित ऊसशेतीसाठी नॅचरल शुगरचा स्वतंत्र प्रकल्प

Green Chana Rate: हिरव्या हरभऱ्याचे दर आले दबावात

January Winter Weather: जानेवारीत थंडीचा मुक्काम कायम

Maharashtra Winter Update: गारठा कमी होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT