औरंगाबाद-स्वराज्य ट्रॅक्टर खरेदी करणारे डाॅ. अनिरुद्ध रामलोंढे यांना चावी देताना संजय वरकड.  
इव्हेंट्स

प्रदर्शनात यंत्रे, नवीन तंत्र, ट्रॅक्टर खरेदीस प्रतिसाद

टीप अॅग्रोवन

   औरंगाबाद (प्रतिनिधी) ः अॅग्रोवनचे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी जसा माहितीचा खजिना ठरले तसेच खरेदीदारांसाठी एक पर्वणीसुद्धा राहले. या प्रदर्शनात शेतमालाच्या खरेदी-विक्रीला जसा प्रतिसाद मिळाला, तीच बाब यंत्र, नवीन तंत्र तसेच ट्रॅक्टर, पूरक व्यवसाय यंत्रांबाबतही घडली. आत्मा कृषी विभागाच्या सहकार्याने शेतकरी गटांची दालने सहभागी झाली होती. या दालनांवर खरेदीसाठी अभूतपूर्व असा प्रतिसाद शेतकऱ्यांना मिळाला. हा प्रतिसाद दुष्काळी भागातून आलेल्या शेतकऱ्यांना मोठे बळ देणारा तसेच उत्साह वृद्धींगत करणारा असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनीच बोलताना व्यक्त केल्या. लाखेगाव येथील निवृत्ती कागदे यांची १२ क्विंटल बाजरी विकल्या गेली. तर ९० क्विंटलची बुकींग मिळाली. त्यांच्याकडील १५ क्विंटल गहू ग्राहकांनी खरेदी केला, तसेच तब्बल २५० क्विंटल गहू ग्राहकांनी अॅडव्हान्स बुक केल्याचे कागदे यांनी सांगितले. दत्तू धोत्रे या शेतकऱ्याची तब्बल दोन क्विंटल हळद पावडर विकल्या गेली. रमेशराव बलांडे (बोरगाव जि. औरंगाबाद) यांच्या गटाकडे गांडूळखत, तूरदाळ, लसूण ग्राहकांनी खरेदी तर केलाच शिवाय पुढील हंगामासाठी बुकींग केली. शेतकरी सुखदेराव अढाऊ यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गुळपट्टीचा व्यवसाय सुरू केला असून, या प्रदर्शनात तब्बल दोन लाखांची विक्री झाल्याचे सांगितले. प्रदर्शनात झाली ट्रॅक्टरची विक्री प्रदर्शनात मोठमोठ्या यंत्र, अवजारांची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. स्वराज ट्रॅक्टरच्या दालनात पैठण येथील शेतकरी डाॅ. अनिरुद्ध रामलोंढे यांनी ट्रॅक्टर खरेदी केला. त्यांना औरंगाबाद सकाळचे संपादक संजय वरकड यांच्या हस्ते चावी देण्यात आली. स्वराज ट्रॅक्टरचे अमित वरुडे, सकाळ अॅग्रोवनचे वरिष्ठ व्यवस्थापक बाळासाहेब खवले व शेतकरी या वेळी उपस्थित होते. सकाळ-ॲग्रोवनने कृषी प्रदर्शनाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून शेतकरी मोठ्या संख्येने प्रदर्शनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. महानंदच्या स्टॉलला प्रतिसाद उत्तम राहिला. चर्चासत्रांमधून शेतकऱ्यांची ज्ञानाची भूक भागली. शेतीपयोगी अवजारे आणि तंत्रज्ञानाची अद्यावत माहिती शेतकऱ्यांना येथून मिळाली. नंदलाल काळे, उपाध्यक्ष, जिल्हा दूध उत्पादक संघ, औरंगाबाद कृषी प्रदर्शनामध्ये अशाप्रकारे एमआयटीच्या माध्यमातून माती व पाणी परीक्षण लॅब सहभागी करून घेण्याचा पहिलाच प्रयत्न होता. या प्रयत्नाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शेतकरी माती व पाण्याचे परीक्षण करण्यासंदर्भात प्रचंड जागरूक दिसून आले. सकाळ-ॲग्रोवनने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनातील माती व पाणी परीक्षणाच्या संधीचे परिणाम लगतच्या काळात दिसून येतील. - प्रा. दीपक बोरनारे, उपसंचालक, एमआयटी सेंटर फोर अॅनालिटीकल रिसर्च अँड स्टडी औरंगाबाद   अॅग्रोवन आणि शेतकरी यांचे अतूट नाते असल्याचं वेळोवेळी जाणवते. या वेळच्या कृषी प्रदर्शनात तर दुष्काळी परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद कल्पनेच्या पलिकडचा आहे. विशेष म्हणजे या वेळी शेतकरी जास्त चौकस असल्याचे त्यांनी घेतलेल्या माहितीवरून जाणवले. गतवर्षी तीन ते चार ट्रॅक्टरची बुकिंग मिळाली होती. या वेळी दुष्काळ असूनही तीन ट्रॅक्टर बुक झाले. कंपनीने दिलेल्या डिस्काउंटचाही शेतकऱ्यांनी लाभ घेतला. - अमित वरुडे, डेप्युटी मॅनेजर स्वराज, ट्रॅक्टर महाराष्ट्र  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Update: घाटमाथा, मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT