हळदीत जास्त पाण्याचा निचरा अावश्यक ः प्रा. ओळंबे
हळदीत जास्त पाण्याचा निचरा अावश्यक ः प्रा. ओळंबे 
इव्हेंट्स

हळदीत जास्त पाण्याचा निचरा अावश्यक ः प्रा. ओळंबे

टीम अॅग्रोवन

पांगरा शिंदे, जि. हिंगोली  ः सद्यःस्थितीत हळदीच्या पिकांमध्ये पाणी साचून राहू देऊ नये. जास्तीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तत्काळ उपाय योजना कराव्यात, असा सल्ला तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रांचे विषय विशेष तज्ज्ञ प्रा. अनिल ओळंबे यांनी केले.

‘अॅग्रोवन’ आणि ‘महाधन’ यांच्या तर्फे हळद पीक व्यवस्थापन या विषयावर पांगरा शिंदे (ता. वसमत) येथे आयोजित अॅग्रोवन संवाद चर्चासत्रामध्ये प्रा. ओळंबे बोलत होते. या वेळी महाधनचे अनिल अनघुले, साहेबराव शिंदे, माणिकराव शिंदे, त्र्यंबक शिंदे, रमेश चेंडके आदी उपस्थित होते.

प्रा. ओळंबे पुढे म्हणाले, की हळदीचे पीक तणमुक्त ठेवावे. पिकाला मातीची भर द्यावी कंदमाशी, करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत कीटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी करावी. या वेळी श्री. अनभुले यांनी महाधनच्या खतांविषयी माहिती दिली. ‘अग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी संतोष जवळे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT