AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची सातासमुद्रापार भरारी
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची सातासमुद्रापार भरारी 
इव्हेंट्स

AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची सातासमुद्रापार भरारी

टीम अॅग्रोवन

अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार तात्यासाहेब रामचंद्र फडतरे मु. रामवाडी, पो. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे

कृषी पदवीधर तात्यासाहेब फडतरे यांनी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन ज्वारीची चकली, शंकरपाळे, इडली असे पदार्थ तयार करून गाव परिसरात विक्री सुरू केली. मागणी वाढल्याने ‘रेडी मिक्स’ उत्पादने ग्राहकांना पुरविण्यास सुरवात केली. गेल्या काही वर्षांत फडतरे यांनी ज्वारीचा रवा, पोहे, इडली व चकली मिक्स, चिवडा आदी उत्पादने ‘गुड टू इट’ या ब्रॅँडने बाजारपेठेत आणली आहेत.

पुणे जिल्ह्यातील रामवाडी, पो. वडापूरी (ता. इंदापूर) येथील तात्यासाहेब फडतरे यांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ज्वारीच्या विविध पदार्थांची विक्री करत ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू केला. हळूहळू ज्वारीचा रवा, पोहे, चिवडा, इडली आणि चकली मिक्स ही उत्पादने राज्यासह देशाच्या अनेक शहरांमध्ये पोचविली. आता ज्वारीच्या उत्पादनांना सातासमुद्रापार पाठविण्यास त्यांना यश आले आहे. कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तात्यासाहेब फडतरे यांनी काही वर्षे खासगी नोकरी केली. काही वर्षांनी नोकरी सोडल्यानंतर केंद्र सरकारच्या भरडधान्य विकास योजनेतून इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील शेतकऱ्यांना एकत्र करून ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू केला. याच वेळी देवळाली प्रवरा येथे त्यांचे सासरेदेखील शेतकरी गटाच्या माध्यमातून ज्वारी प्रक्रिया करत होते. या दोन्ही शेतकरी गटांच्या मालाची विक्री करण्यासाठी फडतरे यांनी समृद्धी ॲग्रो ही फर्म सुरू केली. गृह विज्ञान शाखेत (होम सायन्स) शिक्षण घेतलेल्या त्यांच्या पत्नी सरोजिनी यांच्या मदतीने ज्वारी चकली, शंकरपाळे, इडली असे पदार्थ तयार करून त्याची गावपरिसरात विक्री सुरू केली. कृषी प्रदर्शनातूनही त्यांनी विकसित केलेले पदार्थ आणि उत्पादनांची विक्री सुरू केली; मात्र मागणी वाढत गेल्याने सर्वांना तयार पदार्थ पुरविण्यापेक्षा ‘रेडी मिक्स’ उत्पादने पुरवण्याची कल्पना पुढे आली. यातूनच फडतरे यांनी ज्वारीचा रवा, पोहे, इडली तसेच चकली मिक्स, चिवडा, आदी उत्पादने ‘गुड टू इट’ या ब्रॅँडने बाजारात आणली.

उद्योगाची वैशिष्ट्ये

  •  २०१३ साली २७ लाखांचे भांडवल उभे करून तात्यासाहेब फडतरे यांनी पत्नीच्या मदतीने देवळाली प्रवरा येथे अद्ययावत समृद्धी ॲग्रो ग्रुप ज्वारी प्रक्रिया उद्योगाची सुरवात केली.
  •   ज्वारी, बाजरी आणि नाचणी पासून १६ पदार्थांची निर्मिती. ज्वारी व बाजरीपासून पोहे, रवा, इडली, मल्टीग्रेन फ्लोअर आणि नाचणीपासून बनविलेली इडली, डोसा पीठ व रवा या पदार्थांसह ग्लूटेन फ्री पदार्थांना चांगली मागणी.
  •   प्रक्रियेसाठी सोलापूर भागातील शेतकऱ्यांकडून ज्वारी, बाजरी खरेदी. अकोले आणि नाशिक येथील शेतकऱ्यांकडून नाचणीची खरेदी. शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा ४ ते ५ रुपये जास्त दर दिला जातो. शिवाय वाहतुकीचा खर्चही स्वतःच करतात.
  •   प्रथम पुण्यातील विविध सोसायट्यांमध्ये पदार्थांचे सॅंपल म्हणून मोफत वाटप. मिळालेल्या प्रतिसादानंतर आणि ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर विचार करून पुण्यामध्ये वितरणाची व्यवस्था.  
  •   आज पुण्यामध्ये १६३ ठिकाणी ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध. याशिवाय मुंबई, नाशिक, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी उत्पादनांची विक्री. महाराष्ट्राबाहेर एकूण अकरा ठिकाणी पदार्थांची विक्री.
  •   नेदरलॅंड देशामध्ये पदार्थांची निर्यात. येत्या काळात दक्षिण आफ्रिकेत निर्यातीचे नियोजन.  
  •   अमेरिका, दुबई, स्पेन देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी त्यांचे नातेवाईक ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ आवर्जून घेऊन जातात. त्यामुळे परदेशात पदार्थांची लोकप्रियता वाढली.
  •   राज्यभरातून मागणी वाढल्यामुळे  दोराबजी, फूडप्लस, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, डायबेटिक ट्रॉमा सेंटरमध्ये ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध. पराज्यांतून मागणी वाढल्याने कुरिअरद्वारे माल पाठविला जातो.
  •   पदार्थांची ‘गुड टू इट’ या ब्रॅँडच्या नावाने ऑनलाइन विक्री. त्यासाठी वेबसाइट तयार केली आहे.
  •   प्रकल्पामध्ये सध्या आठ मजूर असून पदार्थांच्या वितरणासाठी स्वतंत्र टीम कार्यरत.
  •   शहरातील नागरिकांना ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे महत्त्व कळावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन. प्रदर्शनात पदार्थांचे मोफत वाटप. सामाजिक कार्यक्रमाची स्पॉन्सरशीप घेतली जाते.
  •   प्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल ३० ते ३५ लाखांपर्यंत पोचली. उद्योगाच्या विकासामध्ये पत्नी सरोजिनी आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा.
  •   प्रक्रिया उद्योगातील प्रगतीमुळे तात्यासाहेब फडतरे यांना शासनाचे दोन पुरस्कार. तसेच खासगी संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

    Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

    Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

    Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

    Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

    SCROLL FOR NEXT