आरोग्यदायी विड्याचे पान 
औषधी वनस्पती

आरोग्यदायी विड्याचे पान

विड्याचे पान सगळ्यांना सुपरिचित आहेच! विड्याचे पान औषध म्हणूनही तितकेच महत्त्वाचे काम करते.प्रामुख्याने कफ कमी करण्यासाठी विड्याचे पान गुणकारी असते.

विनीता कुलकर्णी

कोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी विड्याच्या पानाला मानाचे आणि महत्त्वाचे स्थान असते. विविध समारंभात, छोट्या घरगुती कार्यक्रमात मुखशुद्धीकर म्हणून विड्याचे पान दिले जातेच. त्यामुळे विड्याचे पान सगळ्यांना सुपरिचित आहेच! विड्याचे पान औषध म्हणूनही तितकेच महत्त्वाचे काम करते.

  • प्रामुख्याने कफ कमी करण्यासाठी विड्याचे पान गुणकारी असते. अर्धा चमचा सितोपलादी चूर्ण मधासह चाटण करून पानांना लावावे. आणि लवंग लावून बंद करावे. हे पान सेवन केल्याने कफ कमी होण्यास मदत होते. पान देठासहित घ्यावे.
  • श्‍वसनाचा त्रास होत असल्यास, विड्याचे पान देठासहित घेऊन सितोपलादी चूर्ण, वेलची, ज्येष्ठमध यांच्यासह सेवन करावे.
  • पावसात भिजणे आणि हवाबदलामुळे सर्दीचा त्रास होतो. अशावेळी देठासहित विड्याच्या पानाला मध आणि पिंपळी चूर्णाचे चाटण लावून रात्री सेवन करावे. सर्दीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
  • भूक वाढवण्यासाठी आणि अन्नपचनासाठी विड्याच्या पानात बडीशेप, ओवा घालून एक दिवसाआड किंवा रोज सेवन करावे.
  • बऱ्याचदा घशात कफाचा चिकटा होऊन आवाज बसतो. अशावेळी विड्याच्या पानांचा रस आणि २ मिरे कुटून त्याची पावडर मधातून चाटण घ्यावे. चिकटा कमी होण्यास मदत होते.
  • विड्याची पाने, ज्येष्ठमध, लवंग, वेलची, गुलकंद, कात, चुना, बडीशेप एकत्र करून कुटून केलेला तांबूल पाचक म्हणून काम करतो.
  • पथ्य ः  आंबट दही, ताक, थंड पदार्थ, काकडी, थंड दूध या पदार्थांमुळे कफ वाढतो. त्यामुळे या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. काळजी ः

  • वारंवार कफ, सर्दीचा त्रास होत असल्यास, तज्ञ्जांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार घ्यावा. योग्य त्या तपासण्या कराव्यात.
  • विड्याचे पान औषधी असले तरी त्यामध्ये तंबाखू, गुटखा इत्यादी घालून सेवन करणे हानिकारक ठरते.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Drought Declaration : दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढण्याची शक्यता

    Maharashtra Drought 2026: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ

    Agrowon Sarpanch Mahaparishad: कोल्हापुरात आज विभागीय ‘ॲग्रोवन सरपंच महापरिषद’

    Sugar Prices Issue: साखरेच्या दराबाबत सरकार गंभीर नाही: आमदार जयंत पाटील

    Maharashtra Rain Prediction: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पाऊस शक्य

    SCROLL FOR NEXT