Gokharu 
औषधी वनस्पती

सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरू

गोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला सराटे असेही म्हणतात. याची झुडपे जमिनीवर पसरतात. पाने हरभऱ्याच्या पानांसारखी असतात. या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

विनीता कुलकर्णी

गोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला सराटे असेही म्हणतात. याची झुडपे जमिनीवर पसरतात. पाने हरभऱ्याच्या पानांसारखी असतात. या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

  • बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढणे, ऑक्‍टोबर हीटचा जाणवतो. त्यामुळे मूत्रविसर्जनावेळी जळजळ होणे, थेंब-थेंब स्वरूपात होणे असे त्रास जाणवतात. अशावेळी धने आणि गोखरू समभाग पाव चमचा या प्रमाणात घेऊन १ कप पाण्यात उकळून काढा करावा. दिवसातून किमान १-२ वेळा हा काढा घ्यावा. मेडिकलमध्ये गोखरू काढा स्वरूपात उपलब्ध असतो.
  • गोखरू पावडरचा वापर करून रसायन चूर्ण तयार केले जाते. हे चूर्ण शक्तिवर्धक म्हणून उत्तम काम करते. मात्र चूर्ण घेण्यापूर्वी अजीर्ण, अपचन यासारख्या तक्रारी दूर कराव्यात. रसायन चूर्ण म्हणजेच गोखरू, आवळा आणि गुळवेल यांचे समभाग चूर्ण होय. हे चूर्ण अर्धा ते १ चमचा प्रमाणात पाणी किंवा तुपासह सेवन करावे.
  • स्त्रियांना बऱ्याचदा अशक्तपणामुळे अंगावरून पांढरे जाते. अशावेळी तूप आणि खडीसाखरेसोबत गोखरू पावडरचे सेवन करावे.
  • कमी प्रमाणात आणि वेदना होऊन लघवीला होत असल्यास, गोसूर चूर्णासह गोसुरादी घृत (तूप) दिल्यास आराम मिळतो.
  • बऱ्याच दिवसांपासून लघवीचा त्रास असेल तर गोखरू काढा नियमितपणे घ्यावा.
  • गर्भवती महिलांच्या पोटातील बाळाचे पोषण नीट होण्यासाठी गोखरू, शतावरी, अश्‍वगंधा, ज्येष्ठमध एकत्र करून दुधासह घ्यावे.
  • मूतखड्याचा त्रासामुळे ओटीपोटात आणि कमरेच्या बाजूला वेदना होतात. लघवीला साफ न झाल्याने ओटीपोट जड होऊन दुखते. अशावेळी गोसुरादी गुग्गुळ उत्तम कार्य करते. पण त्याची मात्रा तज्ज्ञांना विचारून ठरवावी.
  • सांधेदुखी, सूज, सांध्यात वेदना अशी लक्षणे असतील तर गोखरू आणि सुंठ यांचा काढा दिवसातून एकदा घ्यावा.
  • पथ्य 

  • कोरडा आहार (फक्त पोळी चटणी) तिखट, ठेचा, सिमला मिरची यांचे सेवन कमी करावे.
  • पाणी भरपूर प्यावे.
  • काळजी 

  • मूतखडा, लघवीला सतत त्रास होत असल्यास, अंगावर काढू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करून खड्याचा आकार तपासून घ्यावा. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियमित औषधे घ्यावीत.
  • लघवीला आग, ताप, पाय दुखणे अशी लक्षणे असतील तर लघवीची तपासणी करून घ्यावी.
  • नारळपाणी, सरबत आणि पाणी भरपूर प्यावे.
  • संपर्क ः डॉ. विनीता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

    Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

    APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

    Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

    Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

    SCROLL FOR NEXT