Lumpy Skin Disease Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin Disease : ‘लम्पी’ने जनावरे बाधित; पशुधन वाहतूक थांबवली

लम्पी स्कीनचा फैलाव होऊ नये म्हणून बाधित भागात जनावरांचे आठवडी बाजार, खरेदी-विक्री बंद आहे. आता बाधित भागातून जनावरांची वाहतूक करण्यालाही प्रतिबंध केला असल्याचा आदेश काढला आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा विळखा (Lumpy Skin Disease Outbreak) घट्ट होताना दिसत आहे. आतापर्यंत लम्पीची लागण (Lumpy Infected) झालेल्या जनावरांची संख्या १०३ झाली आहे. बाधित भागात जनावरांचे लसीकरण (Livestock Vaccination) सुरू आहे. आतापर्यंत ८६ गावांच्या परिसरातील पाच किलोमीटर भागातील संशयित जनावरांनाही लसीकरण केले जात आहे. या गावांच्या शिवारात १ लाख ९ हजार ९२४ संशयित जनावरे असून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

लम्पी स्कीनचा फैलाव होऊ नये म्हणून बाधित भागात जनावरांचे आठवडी बाजार, खरेदी-विक्री बंद आहे. आता बाधित भागातून जनावरांची वाहतूक करण्यालाही प्रतिबंध केला असल्याचा आदेश काढला आहे. आतापर्यंत तीन जनावरांचा या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती आहे. नगर जिल्ह्यात यंदा लम्पी स्कीनचा मोठा विळखा वाढत आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा आजाराची व्याप्ती अधिक असल्याचे दिसत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून

लसीकरण केले जात असले तरी बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. लम्पीचा वाढता धोका पाहता जिल्हा परिषदेसोबत राज्य सरकारचा कृषी आणि पशुसंवर्धन विभाग जागा झाला आहे. आजार नियंत्रणासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात आली असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुकास्तरावर तहसीलदार समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हास्तरावरील समितीत झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन उपायुक्त आणि पशुसंवर्धन अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन आणि पशूधन विकास अधिकारी यांचा समावेश राहणार आहे.

या समित्या लम्पीच्या संनियंत्रणाचे काम करणार असून लसीकरण सोबत बाधित भागातून जनावरांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक थांबवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या कामात दिरंगाई करून आजाराचा प्रार्दुभाव वाढवणाऱ्यांवर दंडात्मक आणि अन्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शनिवारी (ता. ३) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी स्वत: फिल्डवर उतरून बाधित भागात भेटी देत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान, जिल्ह्यात ११ तालुक्यांतील ८६ गावांच्या पाच किलोमीटरच्या परिघात लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण पशुसंवर्धन विभागाने हाती घेतले आहे. नगर जिल्ह्यात लम्पी स्कीनने बाधित असणाऱ्या भागातील पाच किलोमीटरच्या परिघात १ लाख ९ हजार ९२४ संशयित जनावरे असून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहेत. त्यासाठी ८२ हजार २०० लसी उपलब्ध झाल्या असून प्रत्यक्षात ६४ हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे.

तीन जनावरांचा मृत्यू

नगर जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’ आजाराचे मोठे संकट आल्याने शेतकरी, दूध उत्पादक हवालदिल झाले आहे. आतापर्यंत राहुरी, राहाता आणि पाथर्डी तालुक्यांतून प्रत्येकी एक गोवंश जनावराचा लम्पी स्कीनच्या बाधेमुले बळी गेल्याची माहिती आहे. याबाबत मात्र पशुसंवर्धन विभागाने अधिकृत माहिती दिली नसली तरी ‘लम्पी स्कीन’चा विळखा वाढत असल्याने जनावरांचा बळी जाऊ लागल्याने शेतकरी, पशुपालक मात्र पुरते हादरले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Fraud: डहाणूतील शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Sugarcane Crushing Season: कारखान्यांच्या साखर उताऱ्यात यंदा घसरण  

Modern Farming: शेतकऱ्यांचा आधुनिक लागवड पद्धतीकडे वाढता कल

Silk Industry: रेशीम संचालनालयाला मनरेगा कार्यान्वयन यंत्रणा म्हणून मान्यता 

Paddy Farmers Issues: बाजारपेठेअभावी शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT