Lumpy Skin Disease Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : जनावरांसह गोठ्यांची फवारणी करा

राज्यात सद्यःस्थितीत काही जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : राज्यात सद्यःस्थितीत काही जिल्ह्यात लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातर्फे (Department Of Animal Husbandry) विशेष दक्षता घेण्यात आली आहे. ग्रामपातळीवर पशुपालकांनी या आजाराला रोखण्यासाठी जवळील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार गोठा व जनावरांवर औषधांची फवारणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये सन २०२०-२१ मध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला होता. यात एकूण ४५ हजार जनावरे बाधित झाली होती. एक लाख २० हजार गोट पॉक्स लस मात्रा खरेदी करून पशुधनास लसीकरण करण्यात आले होते. सन २०२२-२३ साठी राज्यस्तरावरुन दहा हजार लस मात्रा खरेदी करून संस्थांना रोग प्रादुर्भाव उद्भवल्यास प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी वाटप करण्यात आलेले आहे. पशुपालकामध्ये जनजागृतीचे कार्य पशुसंवर्धन विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे.

पशुपालक व ग्रामपंचायतच्या मदतीने जनावरांच्या गोठ्यामध्ये कीटकनाशक औषधाच्या फवारणी करण्याचे काम चालु असल्याची माहिती डॉ. रत्नपारखी यांनी दिली. जिल्हा आणि तालुकास्तरावर माहितीपर घडीपत्रीका वितरित करण्यात येत आहेत. पशुवैद्यकीय संस्था पातळीवर या रोगाविषयी माहिती होण्यासाठी बॅनर तयार करून लावण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात १६ तालुक्यात शीघ्र कृती दल स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

----

नांदेडमध्ये १८४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत..

नांदेड जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-एकचे ७४, श्रेणी - दोनचे १०४ व राज्यस्तरीय संस्था- ६ असे एकूण -१८४ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेचे तीन फिरते पशुचिकित्सा पथके कार्यान्वित आहेत. सर्व संस्था प्रमुखांना या रोगाविषयी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व तत्काळ उपचार सुरु करावा. गोचिड, गोमाशा व डास निर्मुलन मोहीम सुरु करावी असेही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Barshi APMC Election: बार्शी बाजार समिती निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरु

Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम

Cotton Harvest Wage: कापूस वेचणी मजुरी दर पोहोचला ११ रुपये किलोवर

Farmer Issues: जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या रेशीम शेतकऱ्यांच्या अडचणी

Ativrushti Nuksan: अतिवृष्टीने मोठे नुकसान; दिवाळी सुनी..सुनी

SCROLL FOR NEXT