Sanen Goat Agrowon
ॲनिमल केअर

Goat : जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी?

सानेन शेळ्या इतर शेळ्यांच्या तुलनेत सर्वाधिक दुधाचे उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते.

Team Agrowon

शेळीपासून पैदास होणाऱ्या बोकड विक्रीच्या हेतूनं शेळीपालन हे फायदेशीर ठरते. त्यामुळे आपल्याकडे मुख्यतः मांस विक्रीसाठी च शेळीपालन केले जाते. परंतु शेळीचे दुध ही पौष्टीक मानले जाते, अलीकडे शेळीच्या दुधापासून अनेक मुल्यवर्धीत पदार्थांची निर्मिती होत आहे. जे पदार्थ अधिक पौष्टिक आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहेत. त्यामुळे शहरी भागातील जागरुक ग्राहकांकडून शेळीच्या दुधाला मागणी वाढू लागली आहे. सानेन शेळ्या इतर शेळ्यांच्या तुलनेत सर्वाधिक दुधाचे उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. सानेन शेळीचे मूळ स्थान हे स्वित्झर्लंडच्या सानेन खोऱ्यातील असल्याने तिला सानेन हे नाव पडले आहे.

या जातीच्या कासेवर, कानावर आणि नाकावर काही वेळेस काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात.

कान ताठ, मध्यम लांबीचे असतात. या शेळीचा चेहरा सरळ असतो.

मुख्यतः सानेन शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. या शेळ्यांना शिंगे नसतात.

पाय लहान आकाराचे आणि मान लांब आकाराची असते.

ही शेळी इतर सर्व शेळ्यांच्या तुलनेत जास्त दुधाचे उत्पादन देते. या शेळीपासून मिळणारे दूध सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी योग्य आहे.

कान सरळ वरच्या दिशेने असतात.कासेचा आकार खूप मोठा असतो.

एका प्रौढ नर सानेन शेळीचे वजन सुमारे ७०-९० किलो असते आणि प्रौढ मादी शेळीचे वजन हे ६५ ते ७० किलोपर्यंत असते.

२६० दिवसांत या सानेन जातीची संकरीत शेळी ३२० लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा केवळ १०५ दिवसांचा आहे,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT