milk spoilage
milk spoilage 
कृषी पूरक

कोण-कोणत्या कारणामुळं नासतं दूध ?

टीम अॅग्रोवन

लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आहारातील महत्त्वाचा भाग म्हणजे दूध (milk). दुधातील अनेक शक्तिवर्धक घटकांच्या योग्य प्रमाणामुळे, दुधाला आपण पूर्णान्न म्हणतो. दूध पूर्णान्न (complete food) असले तरी, सध्या दुधाची खालावलेली गुणवत्ता ही मोठी समस्या बनली आहे. 

हेही पाहा- जास्तीचे पैसे देवूनही मिळत नाही निर्भेळ दूध

दूध नाशवंत (perishable) असल्यानं, त्याची योग्य काळजी न घेतल्यास ते लवकर खराब होऊन जाते. दूध खराब होण्याची इतरही बरीच कारणे आहेत. यामध्ये हेही वाचा- दुधापासून कशी बनवतात रबडी -    जनावरांची धार (milking)काढल्यापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास जास्त वेळ लागणे. -    दुधाची भांडी स्वच्छ नसणे.   -    धार काढणारी व्यक्ती स्वच्छ (hygeine) नसणे, धार काढताना हात धुतलेले नसणे. -    धार काढणाऱ्या व्यक्तीला संसर्गजन्य रोगाची बाधा असल्यास. -    जनावरांची कास धुण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केल्यास. -    दुधाची वाहतूक भर उन्हात करणे. -    दुधाची वाहतूक करताना कोल्ड चेनचा वापर न करणे. -    आजारी किंवा उपचार सुरु असलेल्या जनावरांचे दूध निरोगी जनावरांच्या दुधात मिसळणे. -    शिळे आणि ताजे दूध एकत्र केल्यास. -    जनावरांचा गोठा अस्वच्छ असल्यास विशेषतः धार काढण्याची जागा ओलसर असल्यास.

अशा अनेक विविध कारणांमुळे दूध खराब होऊन फाटते. असे दूध वापरास अयोग्य असते. दूध नासल्याने बऱ्याच वेळेस ग्राहकांसोबत, विक्रेत्यांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे गोष्टींचे पालन करावे.   -    धार काढल्यानंतर लगेचच त्याचं वितरण म्हणजे वाटप करावे. -    दुधाच्या शीत वाहतुकीच्या सोयी नसल्यास दुधाचे वितरण जास्त तापमानाला विशेषतः दुपारच्या वेळी करू नये. -    आजारी जनावरांचे दूध निरोगी जनावरांच्या दुधात मिसळू नये. -    धार काढणारी व्यक्ती स्वच्छ आणि निरोगी असावी. -    धार काढण्यासाठी वापरली जाणारी भांडी ही निमुळत्या तोंडाची आणि स्वच्छ असावीत. -    दूध दोहनाची जागा स्वच्छ आणि कोरडी असावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT