which hen is best for egg laying ?
which hen is best for egg laying ? 
कृषी पूरक

अंडी उत्पादनाला कोणती कोंबडी चांगली?

टीम अॅग्रोवन

ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कुक्कुटपालन हा एक चांगला व्यवसाय आहे.  या व्यवसायातून फक्त जीवनस्तर उंचावणार नाही तर, खेडेगावातील महिलांच्या हातात पैसा खेळता राहून, त्यांच्या कुटुंबाची प्रोटीनयुक्त खाद्याची भरून काढण्यास मदत होईल.

हेही पाहा- गिरिराज कोंबडी देते इतक्या अंड्याच उत्पादन 

ग्रामीण भागात पाळल्या जाणाऱ्या कोंबड्या (hen) या तेथील स्थानिक जातीच्या असल्यानं त्याचं अंडी (eggs) उत्पादन कमी असते. या अडचणीवर मात म्हणून देशातील विविध कुक्कुट संशोधन संस्थांनी (Research Institute) अनेक देशी कोंबड्याच्या जाती (Indigenous poultry breeds) विकसित केल्या आहेत. आपल्याकडे अशाही काही जाती आहेत ज्या सर्वात जास्त अंड्याचे उत्पादन देतात.

साधारणपणे कोंबडी १७ ते २० आठवडे वय असताना अंडी द्यायला सुरुवात करते. कोंबडी २४ आठवड्यांची झाल्यावर पूर्ण क्षमतेने अंडी द्यायला सुरुवात करते. हा कोंबड्यांच्या शरीरामध्ये होणारा नैसगिक बदल असतो.

गावठी कोंबड्या वर्षाला ६० ते ७० अंड्याचे उत्पादन देत असतात. याउलट व्हाईट लेघहॉर्न (White Leghorn) कोंबडी वर्षाला २४० ते २६० अंड्याचे उत्पादन देऊ शकते किंवा अनेक अशा सुधारित जातीही आहेत, ज्या आपल्या परसात राहून, किचनमधील टाकाऊ पदार्थांवर स्वतःच पोषण करून १६० ते १८० अंड्याचे उत्पादन देऊ शकतात. उदाहरणार्थ ऱ्होडे आयलंड रेड (Rhode Iland red),  मिनाॅर्का (Minorca) इत्यादी. कुक्कुटपालन हा व्यवसाय मुक्त संचार गोठ्यामधेच गायी-म्हशीसोबतही केला जाऊ शकतो, त्या साठी वेगळे काही करायची गरज नाही. देशी किंवा गावरान क्रॉस जाती अतिशय काटक अणि उत्तम रोगप्रतिकार शक्ती असलेल्या असतात. 

general

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT