तुती लागवड योजना Agrowon
कृषी पूरक

रेशीम शेतीसाठी मिळणार अनुदान

राज्यातील रेशीम शेती उद्योगासाठी शासन विविध योजना राबवीत असते. आपल्याकडील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान रेशीम शेतीसाठी पूरक आहे.

Team Agrowon

राज्यातील रेशीम शेती उद्योगासाठी (silk worm farming) शासन विविध योजना राबवीत असते. आपल्याकडील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान रेशीम शेतीसाठी पूरक आहे. उन्हाळ्यातील काही महिने वगळता इतर ऋतुत तुतीची वाढ जोमाने होऊ शकते.

योजनेचे नाव- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तुती लागवड योजना

योजनेचे लाभार्थी- अनुसूचित जाती आणि जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, महिला प्रधान कुटुंबे, शारिरीक अपंगत्व असलेली कुटुंबे, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

लाभाचे स्वरूप-
- या योजनेअंतर्गत अर्धा एकर ते पाच एकरावर तुती लागवड करणाऱ्या लाभार्थ्यास प्रति एकर वीस हजार रुपये अनुदान देण्यात येते.
- पहिल्या वर्षी सहा हजार रोजमजुरी आणि आठ हजार रुपये साहित्य स्वरूपात अनुदान देण्यात येते.
- दुसऱ्या वर्षी मजुरीपोटी तीन हजार रुपये व तिसऱ्या वर्षी मजुरीपोटी तीन हजार रुपये अनुदान देण्यात येते.

तुती रेशीम उद्योगाचे फायदे-

- रेशीम उद्योगापासून नियमित शाश्वत उत्पन्न मिळू शकते.
- एकदा तुती लागवड केल्यावर १२ ते १५ वर्षे लागवडीचा खर्च येत नाही.
- तुती रोपांची लागवड केल्यापासून ३ ते ४ महिन्यात तुती बाग किटक संगोपनासाठी योग्य होते.
- कमी पाण्यातही तुती जगत असल्यामुळे उन्हाळ्यात किंवा कमी पाण्यात बागा तग धरून राहतात.
- किड व रोग तसेच नैसर्गिक आपत्ती जसे अवकाळी पाऊस, गारपीटीपासून बागेस विशेष नुकसान होत नाही.
- इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीच्या झाडांना पाणी कमी लागते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT