What are the stages of earthworm? 
कृषी पूरक

गांडूळांच्या जीवनातील अवस्था कोणत्या असतात?

गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात.

टीम अॅग्रोवन

गांडूळ (earthworm) पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळ खत (vermicompost) तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता आहे. यासाठी छप्पर तयार करून घ्यावे.

  • गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी(egg), बाल्यावस्था आणि पूर्णावस्था (adult) अशा तीन अवस्था प्रमुख्याने दिसून येतात. पण या सर्व अवस्थांसाठी ओलसर जमीनीची गरज असते.
  • हेही पाहा- गांडूळ खत आणि शेणखत यातील फरक काय?

  • पूर्ण वाढ झालेल्या गांडुळामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन्हीही अवयव असतात. गांडूळ साधारणपणे सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते.
  • या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाच्या अनुकूलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते.
  • गांडुळ जेव्हा पूर्णपणे विकसित होतो, तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराच्या भागाची जाडी वाढते. हे प्रौढ अवस्थेतील गांडुळाचे लक्षण असते.
  • सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य हे दोन ते तीन वर्षांचे असते. आयसेनिया फेटीडा (eisenia foetida) या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते.
  • आयसेनिया फेटीडा या जातीच्या गांडूळाचे उदाहरण घेतल्यास हे गांडूळ १२ ते १५ सेंमी. लांबीचे असून एक किलो गांडुळ अनुकूल वातावरणात वाढवली तर त्यांची संख्या एक वर्षात सुमारे 1.5 ते 2 लाख एवढी  होऊन जाते. 
  • शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांडूळ खत तयार करतात.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

    Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

    CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

    Poultry Processing By Products: कुक्कुट प्रक्रिया उद्योगातील उप-उत्पादनांपासून मूल्यवर्धन

    Crop Damage Panchnama: शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अटीत अडकवू नका; पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा, कैलास पाटील यांची मागणी

    SCROLL FOR NEXT