berseem 
कृषी पूरक

जनावरांना द्या पौष्टिक बरसीम चारा

आपल्या गोठ्यातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा आहारातून द्यायचा असेल, तर जनावरांची एकूण संख्या, चारा लागवडीयोग्य जमीन, पाण्याची सोय, मजुरांची उपलब्धता या गोष्टींचा विचार करून बहुवार्षिक चाऱ्याचे उत्पादन घेणे गरजेचे आहे.

टीम अॅग्रोवन

आपल्या गोठ्यातील जनावरांना वर्षभर हिरवा चारा आहारातून द्यायचा असेल, तर जनावरांची एकूण संख्या, चारा लागवडीयोग्य जमीन, पाण्याची सोय, मजुरांची उपलब्धता या गोष्टींचा विचार करून बहुवार्षिक चाऱ्याचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. बरसीम (berseem) हा उच्च प्रतीचा हिरवा चारा आहे. लागवडीनंतर पहिली कापणी ५० ते ६० दिवसांनी पुढे दर ३०-४० दिवसांनी कापणी करावी. उंची ४० सेंटीमीटर असताना कापणी केल्यास त्या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असून तंतुमय पदार्थांचे प्रमाण तुलनेने कमी असते. सिंचनाच्या सुविधा असलेल्या ठिकाणी ५ ते ६ कापणी घेऊ शकतो. याउलट कोरडवाहू भागात १ ते २ कापण्या घेऊ शकतो.

हेही पाहा -  बहुवार्षिक नेपियर गवत

बरसीम लेगुम्यूनोसि (leguminosae) कुटुंबातील पिक असून ते हवेतील नत्र स्थिरीकरणाचे काम करते. हिवाळ्यात जमिनीची धूप रोखण्याचे काम बरसीम करते.   बरसीम जमीन- मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी असावी. पूर्वमशागतीमध्ये एक नांगरणी (plaughing), २ कुळव्याच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. पेरणी करताना ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी.  वरदान, मेस्कावी, जे.बी. १, जे. एच. बी. १४६ यांसारख्या सुधारीत वाणांचा (variety) वापर करू शकतो. रायझोबियम जिवाणू संवर्धन खत २० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून बीजप्रक्रिया करून घ्यावी. हेक्टरी ३० किलो बियाणे लागते.

पहिली कापणी पेरणीनंतर ४५-५० दिवसांनी करून पुढील कापण्या २५-३० दिवसांनी कराव्यात. प्रति हेक्टरी हिरव्या चाऱ्याचे ६०० ते ८०० क्विंटल उत्पादन ३ ते ४ कापण्यामध्ये मिळू शकते. ताज्या बरसीमचे पौष्टिक मूल्य ताज्या अल्फाल्फा नावाच्या गवताच्या तुलनेत अधिक असते. जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशीच्या गरजा भागविण्यासाठी बरसीम एक चांगला पर्याय आहे. बरसीममध्ये प्रथिने आणि उर्जेचे प्रमाण इतर चाऱ्याच्या तुलनेत जास्त असते. गव्हाच्या सुकलेल्या चाऱ्याबरोबर जनावरांच्या आहारात बरसीमचा समावेश केल्यास ३० टक्क्यापर्यंत जनावरांच्या चारा ग्रहण करण्याच्या क्षमतेबरोबर पचनक्षमता ही वाढलेली दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT