ghee 
कृषी पूरक

दुधाच्या सायीपासून बनवा साजूक तूप

भारतीय संस्कृतीत तुपाचा आहारात समावेश हा अनिवार्य मानलाजातो. तुपाचेसेवन करणे आरोग्यदायी मानलेजाते. पूर्वी घरातच दूध-दुभतं असल्यानेघरातल्या तुपाचा सुगंध प्रत्येक कोपऱ्यात जाऊन बसायचा.

टीम अॅग्रोवन

भारतीय संस्कृतीत तुपाचा आहारात समावेश हा अनिवार्य मानला जातो. तुपाचे सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते.  पूर्वी घरातच दूध-दुभतं असल्याने घरातल्या तुपाचा सुगंध प्रत्येक कोपऱ्यात जाऊन बसायचा. पण हल्ली तर तुपाच्या नावाखाली अनेक ठिकाणी डालडाच विकला जातोय. त्यामुळे तुपाची खरी चवच अनेकांना माहिती नाहीय.

'तूप खाल्ल्यावर येईल रुप' अशी एक काहीशी प्रचलित म्हण आपण फार पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. पूर्वी  लोक घरी तूप बनवायचे ते काही सोप्पे नव्हते. त्यासाठी टोप भरेल, इतकी दुधावरची साय जमा झाली,की  त्यातून लोणी काढले जाते. मग हा लोण्याचा गोळा कढवून घेतला जातो. तोही अगदी मंद आचेवर. मग होते तुमचे घरगुती तूप तयार.

तूप विकत घेताना ते कसे असले पाहिजे ? रवाळ की प्लेन? गायी (cow) किंवा म्हशींचे (buffalo) संगोपन कोणत्या पद्धतीने केले जाते. यावर तुपाचे गुणधर्म काही अंशी बदलत असतात. गायीच्या तुपाला (ghee)पिवळसर रंग असतो तर म्हशीचे तूप पांढऱ्या रंगाचे असते. गायीच्या दुधामध्येच पिवळसर छटा असते, त्यामुळे तुपाला तसा रंग येत असतो.

हेही वाचा - वेगान दूध -  गाईम्हशींच्या दुधाची जागा घेईल?

सध्या आपल्या बाजारात a2 चा बोलबाला मोठ्या प्रमाणात आहे आणि लोकही त्याकडे आकर्षित झाले आहेत. अनेक लोक दुप्पट, तीनपट पैसे देऊन हे विशेष a2 तूप विकत घेताना दिसतात. पण तुम्हाला एक गंमत माहितीय का...आपण खातो त्या किंवा सर्वच प्रकारच्या तुपामध्ये फॅट असते. फॅट (fat) म्हणजे ज्याला तुम्ही चरबी किंवा स्निग्धांश म्हणू शकता आणि a2 हे प्रोटीन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT