Lumpy Skin Agrowon
कृषी पूरक

Lumpy Skin : ‘लम्‍पी स्कीन’च्‍या अटकावासाठी ग्रामस्‍तरीय समिती होणार स्थापन

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने आता या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्तरीय सर्वेक्षण व दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम ॲग्रोवन

सातारा : लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने (Satara Zila PArishad) आता या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्तरीय सर्वेक्षण व दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. लम्पी स्कीनबाबत गतीने उपाययोजना (Lumpy Skin Measure)राबविण्यासाठी या समितीद्वारे कामकाज होईल.

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव पसरत आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे तत्काळ उपाययोजना सुरू आहेत. जनावरांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात येत आहे. या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करताना मनुष्यबळ कमी असले,

तरी शासनाच्या निर्णयानुसार ५४ कंत्राटी पदांची तत्काळ भरती करण्यात आली आहे. या शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार खासगी पशुपदविका धारकांनाही मदतीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुपालकांनी आजारी जनावरांवर वेळेवर उपचार करून न घेतल्यामुळे व पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क न साधल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

या आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर उपचार तत्काळ मिळाल्यास हा आजार बरा होत आहे. मात्र, आजारी जनावरांची माहिती मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर दक्षता बाळगून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यासाठी ग्रामस्तरावर समिती स्थापन करण्यात येत आहे.

सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, गावातील प्रगत पशुपालक यांचा समितीत समावेश आहे.

...असे राहील समिती काम

आजाराची लक्षणे दिसल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधणे, आजारी जनावरांचे विलगीकरण करणे,

गावातील सर्व गोठे जंतुनाशक औषधांनी फवारून घेणे, गावातील बैलगाडी शर्यतीस प्रतिबंध करणे, जनावरांच्या लसीकरणाची खात्री करणे, जनावरांच्या खरेदी- विक्री व वाहतुकीस प्रतिबंध करणे आदी कामे ही समिती करेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sweet Sorghum: कथा गोड ज्वारी संशोधन विकासाची

Agricultural Advice: जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करा

Maharashtra Municipal Election Result 2026: २९ महापालिकांच्या निवडणूक मतमोजणीचा कल हाती, मुंबईवर कुणाची सत्ता?

Sugar Industry: आर्थिक आरोग्याची त्रिसूत्री

Seed Bill: नवीन बियाणे विधेयकाला किसान सभेकडून विरोध

SCROLL FOR NEXT