Animal Care Agrowon
कृषी पूरक

Animal Care : जनावरांतील रेटीकुलम हर्नियावर उपचार तंत्र

Animal Diseases : जनावरे कुरणात चरताना न कळत सुई, तार आणि खिळा या अखाद्य वस्तू त्यांच्या आहारात जातात. यामुळे रेटीकुलम हर्निया आजार दिसून येतो.

Team Agrowon

डॉ. संजीव पिटलावार, डॉ. सुप्रीत कुमार

Animal Health : जनावरे कुरणात चरताना न कळत सुई, तार आणि खिळा या अखाद्य वस्तू त्यांच्या आहारात जातात. यामुळे रेटीकुलम हर्निया आजार दिसून येतो. अखाद्य वस्तू छातीच्या पडद्यापर्यंत पोहोचल्याने दाह सुरु होतो. छातीचा पडदा कमकुवत बनतो. तातडीने लक्षणे तपासून जनावरांची आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया महत्त्वाची आहे.

गाई, म्हशीमध्ये रेटीकुलम हर्निया आजार दिसून येतो. या आजारांचे प्रमाण म्हशीमध्ये जास्त प्रमाणात दिसते. रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. आजाराचे कारण म्हणजे रवंथ करणारे जनावर अधाशासारखे प्रथम चारा खाते, त्यावर कोणतीच चघळण्याची प्रक्रिया न करता गिळून टाकते. सदर प्रक्रिया ही चरत असताना होत असते. विश्रांतीच्या वेळी जनावरे खाल्लेला चारा परत तोंडात घेऊन चघळतात, या प्रक्रियेस रवंथ करणे असे म्हणतात. चरताना जेव्हा एखादी एखादी अखाद्य वस्तू जसे की सुई, तार, खिळा शरीरात जातो, तेव्हा रेटीकुलम हर्निया या आजाराची सुरवात होते.

१) रवंथ करणाऱ्या जनावराच्या जठराचे चार कप्पे असतात. ज्यामध्ये रूमेन, रेटीकुलम, ओमेझम व अबोमेझम असते. जेव्हा अखाद्य वस्तू जठरात प्रवेश करते त्यावेळी ही वस्तू रेटिक्युलममध्ये अडकते. याचे मुख्य कारण म्हणजे रेटीकुलमच्या आतील बाजू ही मधमाशांच्या पोळीप्रमाणे असते. एखादी तीक्ष्ण वस्तू अडकून त्यास इजा पोहचविते. सदर अखाद्य वस्तू जेव्हा इजा करते त्यावेळी या वस्तू सोबत असंख्य सूक्ष्म जीवाणू आणि विषाणू यांचा प्रवेश रेटीकुलममध्ये होण्यास सुरवात होते.
२) या आजारात भूक मंदावते, रवंथ करण्याची प्रक्रिया थांबते. जनावरांना वेदनाशामक व प्रतिजैवकांच्या उपचारामुळे काही दिवसांसाठी जनावरास बरे वाटते परंतु पुन्हा हे जनावर उपचारास प्रतिसाद देत नाही.

आजाराची लक्षणे:
१) जनावरे चारा खाणे, पाणी पिणे बंद करतात, दुधाळ जनावर दूध देणे बंद करतात.
२) बैलाची डोलदार चाल कमकुवत स्वरूपाची दिसून येते. आजारी जनावरे कळपात मागे राहतात.
३) हिरवा चारा खाण्यासाठी दिल्यानंतर पोट फुगते, शेण पातळ स्वरूपाचे असते.
४) गाभण गाईमध्ये पोटफुगी असल्यास छातीच्या पडद्यावर दबाव सतत वाढत जातो, यामुळे छातीचा पडदा कमकुवत होऊ फाटतो. तीक्ष्ण स्वरूपाची अखाद्य वस्तू हदय व फुफ्फुस यांना इजा पोहचते. त्यांचासुद्धा दाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजाराचे निदान:
१) रक्त तपासणी आणि क्ष किरण तपासणीद्वारे आजाराचे निदान होते.
२) जलद गतीने आजारांचे निदान क्ष किरण तपासणीद्वारे विना विलंब करता येते. यामुळे जनावरांचे प्राण वाचविता येऊ शकते.

आजारांवरील उपचार:
१) छातीच्या पडद्याच्या उपचार पद्धतीमध्ये गरजेप्रमाणे शस्त्रक्रियांचा अंतर्भाव होतो. प्रथमतः रवंथ करणाऱ्या जनावराच्या रुमेनची शस्त्रक्रियाकरून (रूमिनोटॉमी) अखाद्य वस्तू बाहेर काढल्या जातात.
२) तीक्ष्ण स्वरूपाच्या अखाद्य वस्तू असल्यास त्यांना यशस्वीरीत्या बाहेर काढणे शस्त्रक्रियेद्वारे शक्य आहे. शस्त्रक्रियेत जनावरांच्या पोटातील खालेला चारा ५० ते ६० टक्के बाहेर काढण्यात येतो. यामुळे दुसऱ्या शस्त्रक्रियेत भूल देण्याकरिता आणि छातीच्या पडद्याच्या शस्त्रक्रियेकरिता पूर्वतयारी करता येते. पोटाच्या खळगीतून चारा काढल्याने शस्त्रक्रिया करतेवेळी जागेचा अभाव कमी करता येतो. तसेच
छातीच्या पडद्याचे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये कोणत्या स्वरूपाच्या प्रक्रियेद्वारे छातीचा पडदा शिवता येईल या बाबींचेही अवलोकन केले जाते.
३) हर्निया हा शरीराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूस अथवा मध्य बाजूस आहे त्याबद्दलचे निदान शस्त्रक्रियेमध्ये बांधता येते. या अंदाजामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणत्या अवयवाबद्दल सजग राहावे हे सुद्धा निर्धारित करता येते.
४) एखादी वस्तू उजव्या किंवा डाव्या बाजूच्या फुफ्फुसात असल्याची खात्री करता येते. त्यानुसार सदर अवयवाच्या निरीक्षणासाठीची पूर्व तयारी करता येते. हर्निया हा मध्यभागात असल्यास तीक्ष्ण वस्तूचा शिरकाव हृदयात असल्याची खात्री करणे शक्य होते.
५) शल्यचिकित्सा आणि क्ष किरण विभागातील संशोधनादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, सदर शस्त्रक्रियेद्वारे जनावरे वाचविण्याचा दर ८० टक्यांपेक्षा जास्त आहे. सदर शस्त्रक्रियेद्वारे जनावरांची प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादन क्षमता पूर्वीप्रमाणे करता येते.
६) शस्त्रक्रियेसाठी पशुचिकित्सा संकुलातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा. तातडीने खात्रीलायक उपचार करावेत.

आजार टाळण्यासाठी नियोजन ः
१) जनावरांना पोषक आणि उच्च प्रतीचा आहार उपलब्ध करून द्यावा.
२) जनावरांनी अखाद्य वस्तू खाऊ नये याकरिता फॉस्फरस, कॅल्शिअम आणि इतर क्षार मिश्रणाचा अंतर्भाव त्यांच्या रोजच्या खुराकांमध्ये करावा. जनावरांना निरोगी ठेवावे.
----------------------------------------
संपर्क ःडॉ.संजीव पिटलावार, ८६०५५३४८६४
(विभाग प्रमुख, शल्यचिकित्सा आणि क्ष किरण विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT