Teat leakage is a serious problem of high milk producing cow and buffalo.  Agrowon
कृषी पूरक

जनावरांच्या सडातून दूध गळती का होते?

गाय-म्हैस विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर सडातून दूध गळत असते. सडातून होणाऱ्या दूध गळतीवर वेळीच उपचार केल्यास, कासेचा दाह या आजारापासून जनावरांना आपण वाचवू शकतो.

Roshani Gole

अनेक वेळेस गाय किंवा म्हैस विण्यापूर्वी किंवा विल्यानंतर (calving) त्यांच्या चारही सडातून दूध गळती (leakage) होते. जास्त दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या सडातून दूध गळती हा प्रकार अधिक दिसत आहे.

जनावरांची धार काढल्यानंतर (milking) सडाची छिद्रे पुढील ३० ते ४५ मिनिटे उघडी असतात. याच उघड्या छिद्रातून मस्टाटीसचे (mastitis)जीवाणू कासेत प्रवेश करत असतात. अशा प्रकारे जीवाणूनी कासेत (udder) प्रवेश केल्यावर जनावरे कासेचा दाह या आजाराला बळी पडतात. कासेचा दाह हा सर्वात खर्चिक आजार आहे. दुभत्या जनावरांना या आजाराची बाधा झाल्यानंतर कितीही उपचार केले तरी, झालेले नुकसान भरून काढता येत नाही.

सडातून दूध गळती होण्याची कारणे-

- सडाच्या टोकाला असलेली गाठ दूध चुकीच्या पद्धतीने काढल्यामुळे, सडाचे छिद्र व्यवस्थित बंद होत नाही. परिणामी दूध गळत राहते.
- जनावरांच्या शरीरात झिंकची कमतरता असल्यास, एका सडातून दूध गळती होत राहते.
- जनावरांच्या शरीरात फॉस्फरसची कमतरता निर्माण झाल्यास देखील चारही सडातून दूध गळती होते.
- ज्या ठिकाणी ऊसाच्या वाडयांचा जनावरांच्या आहारात समावेश केला जातो. अशा जनावरांमध्ये दूध गळती होत असल्याचे दिसून येते. कारण या वाडयातील ऑक्झलेट शरीरातील कॅल्शियमबरोबर संयोग पावून कॅल्शियम ऑक्झलेट मुत्राद्वारे शरीराबाहेर टाकले जाते.
- शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास फॉस्फरस शोषला जाण्यास अडथळा निर्माण होतो.

उपचार-

- जनावरांना त्यांच्या शारीरिक अवस्थेनुसार कॅल्शियमयुक्त आहार द्यावा. मात्र गाभण काळाच्या शेवटच्या तीन महिन्यात जास्त कॅल्शियम आहारात देऊ नये. कारण या काळात जनावरांचे दूध उत्पादन बंद असल्याने अतिरिक्त कॅल्शियम शरीरात शोषला जाण्याची क्रिया मंदावते. परिणामी जनावर विल्यानंतर मिल्क फिव्हर होण्याची शक्यता वाढते.

- तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत बाजारात उपलब्ध असलेली विविध औषधे जनावरांना द्यावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा व कापूस दर दबावात; शेवग्याला चांगला उठाव, मक्याची आवक स्थिर, तर कारलीच्या दरात चढ–उतार कायम

Local Body Elections: नळदुर्गमध्ये वीस मतदान केंद्रे

Farm Labour Shortage: सुगी आली तोंडावर, मजूर मिळेनात बांधावर 

Sanjay Raut on Bihar Election results: 'त्यांना ५० च्या आत संपवले!' बिहार निकालावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया

Hawaman Andaj: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका; सकाळी थंडी वाढली तरी दुपारी उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT