poultry
poultry  
कृषी पूरक

का महागतं उन्हाळ्यात चिकन ?

Roshani Gole

कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना उन्हाळ्यात कोंबड्यांची (hen) विशेष काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात ब्रॉयलर (broiler) कोंबड्याची मरतुक (mortality) मोठ्या प्रमाणात होते. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. उन्हाळ्यामध्ये इतर प्राणी-पक्षांप्रमाणे ब्रॉयलर कोंबड्यांचेही खाद्य (poultry feed) खाण्याचे प्रमाण कमी झालेलं असतं. योग्य प्रमाणात खनिजे (minerals) आणि जीवनसत्त्वे (vitamins) नाही मिळाली तर, त्यांच्या शरीरात बदलाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ते प्रतिकार करणारे घटक तयार होत नाहीत. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढल्याने, आद्रतेचे प्रमाण कमी होत असते. शरीरातील ऊर्जा, पाणी लवकर वापरले जाते. पाण्याचं प्रमाण कमी होत जातं अन कोंबड्या उष्माघाताला (heat stroke) बळी पडतात.

जेव्हा वातावरणातील तापमान हे ३८ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असते तेव्हा कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागतो. वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी कोंबड्या कमी प्रमाणात हालचाल करतात. कोंबड्या पंख पसरून बसतात. चोच उघडी ठेवून शरीरातील उष्णता बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. कोंबड्यांच्या शरीरात घामाच्या ग्रंथी नसल्याने, सतत पाणी पीत राहतात आणि खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते. तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास गेले असता, कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण चार ते पाच टक्क्यांनी कमी होते.

उन्हाळ्यात कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी झाल्याने शरीरासाठी आवश्यक असलेली प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे त्यांना मिळत नाही किंवा मिळाली तरी ती पुरेशी नसतात. अशा वेळी पाण्यातुनच कोंबड्यांना ताण कमी करणारी औषधे द्यावीत. उन्हाळ्यात पाण्याची भांडी २५ ते ३० टक्क्यांनी वाढवावी. उन्हाळ्यात उष्माघातामुळे ब्रॉयलर कोंबड्या जास्त तापमानाला लवकर बळी पडतात. कोंबड्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढते. चिकनची supply कमी झाल्याने दरामध्ये वाढ झाल्याची दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT