Pond preparation before stocking of fish seeed Agrowon
कृषी पूरक

काय असते मत्स्यबीज साठवणुकीची पूर्वतयारी ?

मत्स्य व्यवसाय करताना मत्स्यसंवर्धन तलावामध्ये मत्स्यबीज सोडण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी गरजेची असते. आधुनिक पद्धतीने मत्स्य संवर्धन करताना पूर्वतयारी उत्तम केल्यास चांगल्या उत्पादनाची हमी मिळते.

Team Agrowon

मत्स्य व्यवसाय (fishery) करताना मत्स्यसंवर्धन तलावामध्ये मत्स्यबीज (fish seed) सोडण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी गरजेची असते. आधुनिक पद्धतीने मत्स्य संवर्धन (fish farming ) करताना पूर्वतयारी उत्तम केल्यास चांगल्या उत्पादनाची हमी मिळते.

या तलावामधील पाणी हे वॉटर ड्रेनेज पाइप किंवा मोटर पंपाच्या साह्याने काढून टाकावे. असे केल्याने तलावातील गढूळ पाणी, घातक द्रव्ये, कीटक, बेडूक, जंगली मासे बाहेर निघून जातील. तलावातील घाण बाहेर काढल्यानंतर तलावाच्या तळाला भेगा पडेपर्यंत तलाव चांगला कोरडा करून घ्यावा.

मत्स्यसंवर्धन तलावाची नांगरणी करून घ्यावी. नांगरणी करत असताना ३ ते ४ इंच खोलीवर करावी. यामुळे मातीचे थर वरखाली होऊन, हानिकारक वायू निघून जाण्यास मदत होते. आणि खालच्या ठरतील पोषक घटक वरच्या थरात येतील.

मत्स्यसंवर्धन तलावांतील पाण्याचा सामू ६.५ ते ७.० यादरम्यान असावा लागतो. मातीच्या सामुनुसार चुन्याच्या मात्रेचा वापर करावा. पाण्याचा सामू जास्त असल्यास चुन्याची मात्रा कमी म्हणजे २०० किलो प्रति हेक्टरी द्यावी लागते. पाण्याचा सामू जसजसा कमी होत जातो, तशी चुन्याची मात्रा वाढवत न्यावी लागते. चुन्याच्या वापरामुळे पाण्यातील क्षारता, गढूळपणा नियंत्रणात राहतो. हायड्रोजन सल्फाईड वायूचे प्रमाण कमी होते. चुन्यामुळे ह्यूमिक आणि सल्फ्युरिक आम्लांसारख्या आम्लांचे हानिकारक प्रभाव कमी होतात. माशांची कॅल्शिअमची गरज पूर्ण होण्यासाठी चुना आवश्‍यक असतो.

पाण्याच्या पाईपच्या तोंडाला लहान आकाराच्या छिद्राची जाळी बसवून घ्यावी. जेणेकरून पाण्यामध्ये मत्स्यबीज भक्षक कीटक, मासे येणार नाहीत. तलावाची उंची २ ते २.५ मीटर असेल तर, १.२५ ते १.५ मीटरपर्यंत पाणी भरावे.

तलावातील पाणवनस्पती मासळीच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करतात. पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन जाऊन, पाण्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.

या पाणवनस्पती हाताने उपटणे. पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती जाळ्याने काढणे. तलावाच्या काठावर गुरांना चरण्यासाठी सोडावे. यासाठी गवत कटरचा वापरही करू शकतो. यामध्ये पाणवनस्पती खाणारे मासे तलावात सोडले जातात. गवत्या मासा, सिल्वर बार्ब, सिप्रिनस यांसारखे मासे सोडावेत. गवत्या मासा त्याच्या वजनाच्या चारपट गवत खातो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT