Lumpy Skin Disease Agrowon
कृषी पूरक

Lumpy Skin : दहा हजारांवर जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

जळगाव जिल्ह्यातील स्थिती; १७० जनावरांचा मृत्यू

टीम ॲग्रोवन

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सुमारे १० हजारांपेक्षा अधिक पशुधनास (Livestock) लम्पी स्कीन (Lumpy SKin) आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. तर सुमारे १७० पशुधन मृत्युमुखी पडले आहे. रविवार पर्यंत (ता.२५) जळगाव जिल्ह्यात ९३ टक्के लसीकरण (Lumpy Vaccination)पूर्ण केले, असा दावा केला जात आहे.

जिल्हा परिषदेने फक्त खबरदारीचे आवाहन केले. उपचार, सर्वेक्षण वेळेत केले नाही. मागील वर्षीही लम्पी स्कीन होता. त्या वेळेस लसीकरण १०० टक्के करायला हवे होते, अशी नाराजी शेतकऱ्यांत आहे.

जिल्ह्यातील पाच लाख ७१ हजार ५३ पशुधनापैकी पाच लाख १८ हजार ३६४ पशुधनाचे लसीकरण रविवारी सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आले,

असा दावा प्रशासन करीत आहे. पण उशिरा जाग आली, असे शेतकरी म्हणाले.

जिल्ह्यात १० दिवसांपूर्वी चार हजार ९९८ बाधित पशू आढळले होते. त्यात सतत भर पडली. सर्वेक्षण कमी पडत आहे. रावेरातून हा आजार सर्वत्र पोचला.

सातपुड्यात तो कसा गेला, याचे उत्तर प्रशासन देत नसल्याचे दिसत आहे.

दररोज १५ ते २० हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात येत आहे. जिल्हाभरात चराईबंदी आहे. बचतगटांमार्फत पशुसखी, कृषिसखींद्वारे जिल्हाभरात जनावरांचे सर्वेक्षणदेखील करण्यात येत आहे, असा दावा केला आहे. पण चराई सुरूच आहे. तसेच सातपुड्यात यंत्रणा अजून पोचलेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Farming : नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक तरतुदींसाठी प्रयत्न करू

Parbhani Water Crisis : परभणी जिल्ह्यातील चार लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली

Daryapur Drought : दर्यापुरात कोरडा दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance : जूनमधील पीक नुकसानीसाठी साडेआठ लाख मंजूर

Smart Village : तंत्रज्ञानाचा अवलंब करून गाव समृद्ध करा : डॉ. ससाणे

SCROLL FOR NEXT