Negative Energy Balance in Animals 
कृषी पूरक

गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?

धार काढल्यानंतर गाय लगेचच खाली बसल्याने कासेला जंतुसंसर्ग होऊन कासेचा दाह होण्याची दाट शक्यता असते हे आपणास माहित असेलचं पण गायीची धार काढल्यानंतर गाय खाली बसल्याचे दिसून येते.

रोशनी गोळे

आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना पशुधनाच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण केले पाहिजे. बरेचदा पशुपालकांच्या बघण्यात आले असेल की, धार काढल्यानंतर आपली गाय लगेचच खाली बसते. असं का बरं ? याचा कधी विचार केलाय का? धार काढल्यानंतर लगेचच खाली बसल्याने कासेला जंतुसंसर्ग होऊन कासेचा दाह होण्याची दाट शक्यता असते हे आपणास माहित असेलचं पण गाय का खाली बसते? याबद्दल आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

पण त्या आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही बाहेरून खूप दमून-भागून, घामाने थपथपून घरी परत आल्यावर काय बरं करता? पहिले बसता आणि बसून शांतपणे पाणी पिता हो की नाही? मग गायीच्या शरीरातून ८ ते १० लिटर दूध (milk)  काढल्यानंतर त्यांच्या शरीरात पण पाण्याची उणीव निर्माण होते. तर त्याचं काय असतं...दुधात पाण्याचं प्रमाण असतं ८४ ते ८६ %...बिना भेसळीच (adulteration) बर का... मग १० लिटर दूध देणाऱ्या गायीच्या शरीरातून ८.५ लिटर पाणी एक वेळेस धार काढताना बाहेर येत असत. म्हणजेच त्यांच्या शरीराचं एक प्रकारच निर्जलीकरण होत असत. यासाठीच धार काढल्यानंतर लगेचच त्यांना निर्जंतुक, ताजे पाणी पाजणं गरजेचं आहे.

हेही पाहा- 

सोबतच दुधाचे सेवन आपण कॅल्शियमचा (Calcium) उत्तम स्रोत म्हणून पण करत असतो. म्हणून कॅल्शियमची गरज तत्काळ भरून काढण्यासाठी दुधाळ जनावरांना शिरेतून कॅल्शियम दिल पाहिजे. गुळाचा समावेश खाद्यात केला पाहिजे. असं केल्यानं जनावरांना निगेटिव (Negative) एनर्जीमध्ये जाण्यापासून आपण वाचवू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT