Multicut Napier Fodder
Multicut Napier Fodder 
कृषी पूरक

बहुवार्षिक नेपियर गवत

टीम अॅग्रोवन

पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार व्यवस्थापनावर होत असतो. या ६० ते ७० टक्क्याच योग्य व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय अधिक किफायतशीर होऊ शकतो.  यात चारा उत्पादन व व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग आहे. 

नेपियरसाठी पूर्वमशागत-   लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि 2 ते 3 वेळा वखरणी करून जमीन तयार करावी. लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.

लागवड पध्दती-

  1. सुपर नेपियर गवताची कांडी ४ फूट x २ फूट अंतरावर लावल्यास चारा उत्पादन मुबलक मिळते. ४ फुटाची सरी केल्यामुळे आंतरमशागती सोबतच चारापिकास पाणी देणे सोयीचे जाते.

  1. खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांत या गवताची लागवड करावी. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी.

  1. तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात.

  1. सरासरी दोन ठोंब्यांतील अंतर ९० x ६० सें. मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते.

  1. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार प्रतिहेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश द्यावे. पुढे पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी कापणीनंतर २५ किलो नत्र द्यावे.

  • गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करावी.
  • उन्हाळी हंगामात (फेब्रुवारी ते मार्च) लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • कापणी लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण १५ ते २० सें. मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सहा ते आठ आठवड्यांनी कराव्यात. वर्षभरातील सात ते आठ कापण्यांनंतर हेक्टरी २००० ते २५०० क्विंटल उत्पादन मिळते.
  • उष्ण कटिबंधातील वातावरण या पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. संकरित बाजरी नेपीयर गवताच्या लागवडीसाठी ३१ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते.
  • वर्षभर हिरव्या चाऱ्याची गरज भागवण्यासाठी चारा पिकांचे नियोजन करून तशी उपलब्धता ठेवावी लागते. नेपीयर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखले जात होत. हे त्याच्यातील उंचपणा व जास्तीत जास्त फुटवे देण्याच्या क्षमतेमुळे ते नावारूपाला आले होते. नेपियर गवत हे बहुवार्षिक असल्यामुळे ते एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षांपर्यंत चारा उत्पादन देऊ शकतो.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT