Milk Rate  Agrowon
कृषी पूरक

Milk Rate : खासगी डेअरीप्रमाणे दुधाला दर द्यावा

खासगी डेअरी प्रमाणे दुधाला दर देण्यात यावा, या मागणीसह वार्षिक लेखा जोखाविषयी अनेक सभासदांनी संचालक मंडळावर प्रश्‍नाची सरबत्ती केली.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : खासगी डेअरी (Private Dairy Milk Rate) प्रमाणे दुधाला दर देण्यात यावा, या मागणीसह वार्षिक लेखा जोखाविषयी अनेक सभासदांनी संचालक मंडळावर प्रश्‍नाची सरबत्ती केली. त्यामुळे शनिवारी (ता. १०) झालेली जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.

संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार हरिभाऊ बागडे, माजी आमदार कल्याण काळे, उपाध्यक्ष दिलीप निरपळ, संचालक नंदलाल काळे, कचरू डीकेपाटील, गोकुळसिंग राजपूत, श्रीरंग साळवे, संदीप बोरसे, सविता अधाने, सुमित्राबाई चोपडे, राजेंद्र जयस्वाल, पुंडलिकराव काजे, शिलाबाई कोळगे, अलका पाटील, इंदूबाई सुरडकर, राजेंद्र पाथ्रीकर, अनिल हातेकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप पाटील उपस्थित होते.

सभेत वार्षिक अहवालातील नफा आणि तोट्याविषयी काळे, बनकर यांनी अक्षेप घेतला. गेल्या वर्षी १३ लाखांचा नफा झाला होता. इतर उत्पादनाचा व्यवसाय चांगला असतानाही यंदा नफा घटून ९ लाखांचा झाला. दूध संकलनही मोठ्या प्रमाणावर घटले. खर्च वाढला मात्र संकलन आणि नफा कमी झाल्याचा प्रश्‍नही काळे आणि इतर सभासदांनी उपस्थित केला.

कर्मचाऱ्यांप्रमाणेच किती संचालकांनी उचल घेतली आहे. परत पैसे न भरलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सभासदांनी केली. दूध खरेदीदर वाढवा, संघाच्या जागेचे येणारे भाडे, सीसीटीव्ही बसवण्यात यावे, खासगीऐवजी शासकीय ऑडिटर नेमावा आदींविषयी नंदकिशोर प्रश्‍न उपस्थित झाले. दूध संघाचे काम नफा कमावणे नाही, तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे हा संघाचा उद्देश असल्याचे सांगत बागडे यांनी खासगी डेअऱ्यांना दूध न घालता संघालाच दूध घालण्याची सूचना केली. अपेक्षित उत्तर न मिळाल्याने अनेक सभासदांनी सभात्याग केला. सभेत बागडे समर्थक आणि सभासदांची शाब्दिक चकमक बघायला मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT