gochid 
कृषी पूरक

जाणून घेऊया, गोचीडचा जीवनक्रम

गोचीड दोन प्रकारचे असतात. नर आणि मादी गोचीड. करड्या रंगाचा मोठा गोचीड म्हणजे मादी गोचीड आणि लाल रंगाचे लहान गोचीड म्हणजे नर गोचीड. नर व मादी गोचीडाचे जनावरांच्या अंगावर मीलन होते.

टीम अॅग्रोवन

गोचीड दोन प्रकारचे असतात. नर आणि मादी गोचीड. करड्या रंगाचा मोठा गोचीड म्हणजे मादी गोचीड आणि लाल रंगाचे लहान गोचीड म्हणजे नर गोचीड. नर व मादी गोचीडाचे जनावरांच्या अंगावर मीलन होते. त्यानंतर मादी गोचीड गोठ्यात, गव्हाणीत अंडी घालते. मादी गोचीड जवळपास ३००० ते ५००० अंडी घालू शकते.

हेही पाहा- जनावरांमधील गोचीड नियंत्रण आणि औषधोपचार

गोचीडाचे दुष्परिणाम – गोचीड जनावरांच्या शरीरातील २ ते ५ मिली रक्त (blood)  शोषून घेतात. गोचीडांनी चावा घेऊन केलेल्या जखमांवर माशा आकर्षित होतात. परिणामी वेगवेगळ्या विषाणूजन्य, जीवाणूजन्य एकपेशीय रोगांचा प्रादुर्भाव होतो. जनावरांच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाल्याने जनावरांना ॲनिमिया (anemia) हा आजर होतो. जनावरांच्या त्वचेवर जखम केल्याने, त्याठिकाणी जखम होऊन खाज सुटते. जनावरे अस्वस्थ होतात परिणामी त्यांची उत्पादकता व कार्यक्षमता कमी होते.

गोचीड ताप (gochid tap)हा गायी-म्हशींमध्ये आढळणारा आजार असून, याचा प्रसार गोचीडच्या माध्यमातून होतो. परिणामी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. संकरित गायींमध्ये हा आजार अधिक प्रमाणत आढळतो. गोचीड ताप या आजाराला थायलेरिॲसिस (Thieleriasis) म्हणतात. या आजारात तांबड्या रक्तपेशींचा (red blood cells) नाश होतो. परिणामी रक्तातील हिमोग्लोबिनचे (haemoglobine) प्रमाण कमी होते. रोगाचे एकपेशीय जंतू जनावरांच्या शरीरामध्ये लीम्फ ग्रंथींमध्ये (lymph node) वाढतात, परिणामी जनावरांच्या शरीरातील लीम्फ ग्रंथींचा आकार वाढतो. थायलेरिया ॲन्यूलाटा, थायलेरिया ओरिन्तालीस या रोगकारक जंतूमुळे हा रोग होतो.

general

general

general

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Pumps Power Connections: महावितरणकडून १३ हजारावर कृषीपंपांना वीजजोडण्या

Sugarcane Smut Disease: उसावरील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण कसे करावे?

Kharif Crop Loan Rates: नांदेडला पिकांसाठी पीककर्ज दर निश्चित

Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?

Mohol-Tandulwadi Highway Project: मोहोळ-तांदूळवाडी महामार्गावरून सोलापुरात ‘श्रेयवाद’

SCROLL FOR NEXT