Importance of calcium in lactating animals 
कृषी पूरक

दुधाळ जनावरांसाठी कॅल्शियमचे महत्त्व

गाय म्हैस विल्यानंतर त्यांच्या शरीरात कॅल्शियमची उणीव निर्माण होते. गर्भाची वाढ होत असताना जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम वापरले जाते.चिक दुधामधून ०.२६% आणि दुधामधून ०.१२% इतक्या प्रमाणात कॅल्शियमचा प्रवाह होत असतो.

रोशनी गोळे

गाय म्हैस विल्यानंतर त्यांच्या शरीरात कॅल्शियमची उणीव निर्माण होते. गर्भाची वाढ होत असताना जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम वापरले जाते, विल्यानंतर चिक दूध निर्माण करण्यासाठी कॅल्शियम मोठ्या प्रमाणात दूध उत्पादनासाठी वापरले जाते. त्यामुळे विल्यानंतर झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी संतुलित आहार देणे गरजेचे असते.

कॅल्शियमची गरज दुधाळ जनावरांमध्ये अधिक असते कारण गायी - म्हशी विल्यानंतर ४८ तासांच्या आत अचानक वाढलेल्या कॅल्शियमच्या (Calcium) गरजेमुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते आणि १ ते २ दिवसात जनावरांमध्ये आजाराची लक्षणे दिसू शकतात.

चिक (Cholostrum) दुधामधून ०.२६% आणि दुधामधून ०.१२% इतक्या प्रमाणात कॅल्शियमचा प्रवाह होत असतो.  कॅल्शियम दूधनिर्मितीमध्ये एक महत्वाचे मुख्य खनिज (Mineral) आहे.  एक लिटर दूध तयार करण्यासाठी साधारणत: २ ग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. सर्व साधारणपणे १० किलो चीक देणाऱ्या गायीच्या शरिरातून जवळपास २३ ग्रॅम कॅल्शियम चिकामध्ये स्रावले जाते. जे एकूण रक्तात असणाऱ्या कॅल्शियमच्या ९ पट अधिक असते. परिणामी रक्तातील कॅल्शियम कमी होते आणि जनावरे दुग्धज्वर (Milk fever) या सारख्या आजारास बळी पडतात. ही कॅल्शियमची होणारी घट भरून काढण्यासाठी जनावरांना आहारात कॅल्शियम देणे अत्यंत गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT