How to identify fresh fish while purchasing 
कृषी पूरक

ताजे मासे कसे ओळखावेत ?

अनेक वेळेस आपण मासे खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जातो. मासे खरेदी करताना शिळे किंवा खराब मासे मिळण्याचा धोका अधिक असतो. मासे ताजे असतील तर जेवणाला चांगली चव येते. ताजे मासे ओळखणे ही देखील एक कला आहे.

टीम ॲग्रोवन

मासे ताजे आहेत हे कसे ओळखावे ?
ताजे मासे (fresh fish) दिसायला तरतरीत व चकचकीत ओलसर दिसतात. मासे मरगळलेले असल्यास असे मासे विकत घेऊ नयेत. काही ताज्या माशांना त्यांच्या प्रकारानुसार किंचित वास असला तरी घाण कुजकट वास येत नाही. खराब मासे (spoiled fish) काही वेळा ताज्या माश्यांच्या ढिगात मिसळून विकले जातात. या प्रकारात कुजकट वास आणि मरगळलेले मासे (stale fish) ओळखणे केवळ साधने अंतीच शक्य होते. मासे ताजे नसल्यास असे मासे बोटाने थोडासा दाब दिल्यावर त्या जागी खोलगट ठसा उमटतो. याउलट ताज्या माशांमध्ये असे होत नाही.

काही मासे कापून त्यांची विक्री केली जाते. ताज्या माशांचे तुकडे दिसायला व्यवस्थित असतात व त्यावर पारदर्शक पांढऱ्या रंगाची एक झाक असते. ताज्या माशाचे कल्ले काहीसे उघडून पाहिल्यास आतील भाग बऱ्यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतो. रंग फिक्कट असल्यास मासे ताजे नसतात.

बोंबील ताजे असताना तोंडाकडचा भाग केशरी, गुलाबी रंगाचा असतो. ताज्या माशाचे कल्ले जरा उघडून पाहिल्यास आतमधून बर्‍यापैकी लाल किंवा गुलाबी दिसतील. खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पाहावी. पाठ कडक असेल तर खेकडे मांसाने भरलेले असतात. याउलट पाठ दबल्यास खेकडे आतून पोकळ आहेत असे समजावे. माशांचे तोंड उघडून बघावे. ताज्या माशांच्या तोंडाच्या आतील रंग लालसर असतो. काळसर रंग दिसल्यास मासे शिळे किंवा खराब समजावे.

पापलेट घेताना डोळ्याखालचा भाग दाबून बघावा. त्यातुन पांढरे पाणी आले तर ते ताजे समाजावे आणि लाल पाणी आल्यास ते शिळे असतात हे समजावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पुढील ५ दिवस पाऊस कमी; पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Crop Damage Compensation : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या ः पालकमंत्री पाटील

Solar Project : सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज

Beed Rainfall : बीडमध्ये समाधानकारक पाऊस नाही

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

SCROLL FOR NEXT