How many types of poultry breeds seen in Satpuda range hills? 
कृषी पूरक

सातपुडा पर्वतात कोंबड्यांच्या कोणत्या जाती आढळून येतात?

कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामुख्याने अंडी आणि चिकनसाठी केला जातो. चिकनला पांढरे मांसअसेही म्हणतात. मांसासाठी ब्रॉयलर आणि अंड्यासाठी लेअरचा वापर केला जातो.

टीम अॅग्रोवन

कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामुख्याने अंडी आणि चिकनसाठी केला जातो. चिकनला पांढरे मांस (white meat) असेही म्हणतात. मांसासाठी ब्रॉयलर (broiler) आणि अंड्यासाठी लेअरचा (layer) वापर केला जातो. यासाठी कोंबडीच्या (hen) अनेक सुधारित जाती विकसित केल्या आहेत. तर काही तेथील वातावरणानुसार क्रॉसिंग होऊन तयार झाल्या आहेत. चिकन (chicken) आणि अंडी (eggs) देखील आपल्या शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरवतात. हेही पाहा- गाभण काळात जास्त कॅल्शिअम दिल्यास गायीला होतो हा आजार!  सातपुड्यात आढळणाऱ्या कोंबड्यांची विविधता हायली कुकडी (उलट्या पंखांची कोंबडी)

  • या कोंबड्यांचे प्रमाण सातपुड्यात अधिक आहे.
  • या कोंबडीचा समावेश शेतकरी कोणत्याही शुभकार्यात करीत नाही.
  • काही स्थानिक शेतकरी या प्रकारच्या कोंबड्यांना अशुभ मानतात. यांची विक्रीदेखील केली जात नाही.
  • मात्र काही ठिकाणी आवर्जुन या कोंबड्याची अधिक पैसे देऊन खरेदी केली जाते.
  • हेही वाचा- कमी पावसाच्या भागात करा ‘या’ खताचा वापर टाल्या कुकडी (नेकेड नेक)

  • या कोंबडीची उंची इतर कोंबड्यांपेक्षा अधिक असते.
  • या कोंबडीच्या मानेच्या भागावर पिसे नसतात.
  • या कोंबडीमध्ये आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता इतर कोंबड्यांपेक्षा अधिक असते.
  • मानेवर पिसे नसल्याने या कोंबडीला लोकांकडून कमी पसंती असल्याचे दिसून येते.
  • हेही वाचा- गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात जास्त कॅल्शिअम देऊ नये ? काभऱ्यो कुकडी (मिश्र रंगाच्या)

  • या कोंबड्या उंचीला कमी, मिश्र रंगात आढळून येतात.
  • या पक्षांच्या पायाची लांबी इतर जातींपेक्षा आखूड असून, रोगप्रतिकारक शक्ती अधिक आहे.
  • अंड्याचा रंग फिक्कट तपकिरी असतो.
  • अंड्याचा आकार मध्यम असून लोकांकडून चांगली मागणी आहे.
  • कल्यो कुकडी (काळा रंग)

  • कोंबड्या काळ्या रंगाच्या असतात.
  • कडकनाथ जातीशी साम्यता दर्शविणारे शारीरिक गुणधर्म यांच्यात आहेत.
  • पायांचा रंग फिक्कट पिवळसर, डोळ्यांचा रंग तपकिरी असतो.
  • गावठी कुकडी

  • कोंबड्या आकाराने मोठ्या, मिश्र रंग, डोळे फिक्कट काळसर तपकिरी असतात.
  • या कोंबड्याचे वजन अधिक असते.
  • या जातीचे साधर्म्य गुजरात राज्यातील अंकलेश्वर जातीशी केले आहे.
  • गावठी कुकडीचे मांस लवकर शिजते आणि बाजारातही चांगली मागणी आहे.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Gram Panchayat Reservation: ग्रा. पं. सदस्यांच्या आरक्षण सोडतीला लागला मुहूर्त

    Nilesh Lanke Demands: पेट्रोल व्हॅट, सरचार्ज रद्द करून जनतेला दिलासा द्या : लंके

    Solapur Gram Panchayat Reservation: सोलापुरातील ७०१ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत १२ जूनला

    Satara Gram Panchayat Reservation: साताऱ्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    Cotton Farming: अमरावती विभागात अतिसघन कापसावर भर

    SCROLL FOR NEXT